Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यभरातील चालकांसाठी नाशिकला विशेष प्रशिक्षण केंद्र उभारणार

राज्यभरातील चालकांसाठी नाशिकला विशेष प्रशिक्षण केंद्र उभारणार

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

राज्यातील वाढत्या अपघातांचे ( Accidents ) प्रमाण कमी व्हावे तसेच इंधनाची बचत व्हावी, यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेत विशेष धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या कामी केंद्रीय रस्ते, वाहतुक व महामार्ग विभागाचे मंत्री नितीन गडकरी (Union Minister of Roads, Transport and Highways Nitin Gadkari)यांच्या आदेशानुसार राज्यातील तेल इंडस्टीने पुढाकार घेतला असून राज्यभरातील चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी नाशिक येथे विशेष प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा हालचाली सुरु झाल्या आहे.

- Advertisement -

हे प्रशिक्षण केंद्रासाठी इगतपुरी तालुक्यातील ( Igatpuri Taluka ) मुंडेगाव किंवा पाडळी-देशमुख शिवारातील जागा निश्चित होण्याच्या मार्गावरअसल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली.राज्यात मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याने रोज शेकडो प्रवाशांचा हकनाक बळी जात असून शेकडो अनेकांच्या वाट्याला कायमचेच अपंगत्व येत आहे. याबरोबरच चालकांना योग्य प्रशिक्षण नसल्याने रोज लाखो लिटर इंधनही वाया जात आहे. यावर ठोस असा मार्ग काढण्यासाठी खा.गोडसे यांचा नितीन गडकरी यांच्याकडे सततचा पाठपुरावा सुरू होता.

राज्यातील चालकांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावेत असे आदेश केंद्रीय रस्ते, वाहतुक व महामार्ग विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. प्रशिक्षण केंद्र उभारण्याची जबाबदारी भारत पेट्रोलियम कंपनीला दिली असून नागपूर येथे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहेत. आता नाशिक जवळील इगतपुरी तालुक्यात प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

पाडळी-देशमुख किंवा मुंडेगाव शिवारात प्रशिक्षण केंद्रासाठी जागा निश्चीत होणार आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी सुमारे 15 एकर शासकीय जागा लागणार असून 20 कोटी रूपयांचा निधी खर्च होणार आहे. राज्यभरातील विविध वाहनांवरील चालकांना या केंद्रातून अपघात टाळणे, इंधन बचतीचे धडे आणि प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहीती खा. गोडसे यांनी दिलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या