Sunday, May 19, 2024
Homeजळगावआठ लाखांचे साहित्यासह चोरीस गेलेले वाहन सापडले

आठ लाखांचे साहित्यासह चोरीस गेलेले वाहन सापडले

पाळधी (Pāḷadhī) – वार्ताहर

रेडीमेट कपडे, प्लायवूड, संगणकाचे पार्टस्सह इतर आठ लाख रुपये किमतीचे साहित्य असलेले मालवाहू वाहन जळगाव शहरातील अजिंठा चौकानजीकच्या ईदगाह व्यापारी संकुलाजवळून चोरट्याने लांबविल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे वाहन दि. 20 रोजी पाळधी खुर्द (ता. धरणगाव) येथे पोलीस पथकाला आढळून आले. मालासह हे वाहन मालकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- Advertisement -

थोडक्यात हकीकत अशी, की दीपक पंडीत हळदे (वय 32, रा.जमुना नगर, जुना खेडी रोड, जळगाव) या तरुणाकडे दोन मालवाहू वाहने असून ते ट्रान्सपोर्टला लावलेले आहेत. दि. 16 ऑक्टोबर रोजी चालक सरफराज उर्फ गुड्डू अहमद तडवी याने बळीराम पेठेतील साई ट्रान्सपोर्टजवळून रेडीमेड कपडे, प्लायवूड, ऑटोपार्टस, संगणकाचे पार्टस्, इलेक्ट्रीकल साहित्य, पाईप बंडल, प्लास्टीक वस्तू, हार्डवेअर, रंग आदी आठ लाख रुपये किमतीचे साहित्य टाटा कंपनीची 709 वाहनात (क्र.एम.एच.15 ए.जी. 6399) भरले होते.

सावदा, फैजपूर व रावेर या भागातील व्यापार्‍यांकडे हे साहित्य पोहचवायचे असल्याने वाहनात वस्तू पॅकींग करुन त्या दिवशी रात्री 11.30 वाजता वाहन अजिंठा चौकानजीकच्या इदगाह मैदानाजवळ उभे केले होते. दुसर्‍या दिवशी हा माल पोहचवायचा असल्याने सकाळी 7 वाजता चालक गुड्डू गाडीजवळ गेला असता तेथे वाहन नव्हते. आजुबाजुला चौकशी केल्यावरही काहीच माहिती मिळाली नाही, त्यामुळे पुण्यातील नारायणगाव येथे सासरवाडीला असलेल्या मालक दीपक हळदे यांना हा प्रकार सांगितला.

याप्रकरणी दिपक पंडीत हळदे यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 692/2021, भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपास पो.ना. सचिन मुंडे व पथक करीत होते. पथकाने धुळ्यापर्यंत तपास करुन सी.सी.टी.व्हि. फुटेज तपासणे सुरु केले होते. पथक बुधवारीही तपासावर होते. मात्र, पाळधी पोलीस दुरक्षेत्राचे सपोनि गणेश बुवा यांना टाटा कंपनीची 709 वाहन (क्र.एम.एच.15 ए.जी. 6399) जि.प.मराठी शाळा फुले नगर पाळधी खुर्द, ता. धरणगाव येथे रस्त्यावर एक बाजुस बेवारस अवस्थेत उभे आहे, अशी माहीती मिळाली.

माहिती मिळताच सपोनी गणेश बी बुवा, पो.हे.कॉ.- अरुण निकुंभ, विजय चौधरी, संजय महाजन. पो.कॉ.- किशोर चंदनकर, अमोल सुर्यवंशी यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचून वाहनाची पाहणी केली. टाटा कंपनीची 709 वाहन व माल हे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील असल्याची खात्री पटल्यानंतर सपोनि. गणेश बुवा यांनी तपासी अंमलदार पो.ना. सचिन मुंडे व पथकाला माहिती दिली. तातडीने तपासावर असलेले पथक पाळधी येथे दाखल झाले. पो.ना. सचिन मुंडे व पथकाने वाहन व मालाची खात्री करुन गाडी मालक दिपक पंडित हळपे यांच्या ताब्यात वाहन व माल दिला. पुढील तपास पो.ना. सचिन मुंडे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या