ओझर | प्रतिनिधी Ozar
आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास भारत पेट्रोलियम(Bharat Petroleum) मधून घरगुती गॅस सिलेंडर भरलेला ट्रक क्र.एम एच १५ एच एच २७८४ हा मालवाहू ट्रक ओझर सर्विस रोडने मालेगावकडे जात असतांना. त्याच वेळी दुचाकीवर अर्पिता प्रकाश शिंदे, व तिची आई आणि बहिण जात होत्या. ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत तिघे खाली पडल्या यात उपस्थित नागरिकांनी आरडाओरड केल्याने ट्रक ड्रायव्हरने ब्रेक लावला त्यात अर्पिता शिंदे ही डाव्या बाजूकडील मागच्या चाकात अडकल्याने जागीच गतप्राण झाली तर आईला आणि बहीणीला पायाला दुखापत झाली.
यावेळी ट्रक चालकाला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. तर आईला इस्पितळात दाखल करण्यात आले. अर्पिताचे शवविच्छेदन करण्यासाठी पिंपळगाव येथे नेण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस करत आहे ओझर गावात राहणारी अर्पिता शिंदे ही ओझर येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अभिनव बाल विकास मंदिर येथे इयत्ता तिसरीत शिकत होती. तिच्या दुर्दैवी अपघाताची बातमी समजताच शाळेवर शोककळा पसरली.
एनएचआयचा गलथान कारभार अन ढिसाळ नियोजन : राजेंद्र शिंदे
सद्या मुंबई आग्रा महामार्गावर सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम चालू असून वाहतुक सर्विस रोडने डायव्हर्ट केली असून गडाख कॉर्नर व इतर ठिकाणी गतीरोधक नसल्याने अपघात होत आहेत एवएचआयच्या ढिसाळ नियोजन कारभारामुळेच हे अपघात होत आहे डायव्हर्ट ठिकाणी त्वरीत गतीरोधक बसवावे
राजेंद्र शिंदे अध्यक्ष ओझर मर्चंट बँक तथा माजी सरपंच ओझर
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा