Thursday, October 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोकाट कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी अनोखा एल्गार; निफाड नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर सोडले कुत्रे

मोकाट कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी अनोखा एल्गार; निफाड नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवर सोडले कुत्रे

निफाड | प्रतिनिधी Niphad

- Advertisement -

निफाड शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निफाड नगरपंचायत प्रशासनाला वारंवार तक्रारी व निवेदने करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याच्या निषेधार्थ उबाठा युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी निफाड नगरपंचायतीत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

आंदोलनकर्त्यांनी चक्क चार मोकाट कुत्रे नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या टेबलवर सोडून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी मुख्याधिकारी भामरे यांच्या टेबलला नोटांचा हार घालून निषेध नोंदविण्यात आला. मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांना दुखापत झाल्याच्या तक्रारीही प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध गणेश मंडळांकडे जाणार्‍या नागरिकांनाही मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे रंधवे यांनी सांगितले.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरपंचायतीने मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी ए.बी.सी कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. श्वान पकडण्यासाठी आवश्यक यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी करण्यात आली. मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत नगरपंचायत प्रशासनाला यापूर्वीही अनेकदा माहिती देण्यात आली. मात्र, अपेक्षित पातळीवर उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही, तर नागरिकांना सोबत घेऊन पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा रंधवे यांनी दिला आहे. याप्रसंगी नगरसेविका रुपाली रंधवे, सुनील पाठक, बिरजू पठाण, रतन गाजरे, सचिन खडताळे आदींसह नगरपंचायत सेवक उपस्थित होते.

मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदी मोहीम आणि श्वान पकडण्याची प्रभावी व्यवस्था तातडीने सुरू करावी. अन्यथा युवासेनेच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
– खंडू पाटील बोडके, निफाड शिवसेना तालुकाध्यक्ष

ताज्या बातम्या

नरेंद्र

PM Narendra Modi On Nana Patekar Death: नाना पाटेकर गेले पण...

0
मुंबई | Mumbaiज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नाना पाटेकर...