Saturday, October 31, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNana Patekar Passes Away: हे खरोखरच धक्कादायक आहे...नाना पाटेकरांच्या निधनाने सयाजी शिंदेंना...

Nana Patekar Passes Away: हे खरोखरच धक्कादायक आहे…नाना पाटेकरांच्या निधनाने सयाजी शिंदेंना मोठा धक्का

मुंबई | Mumbai
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी नाना पाटेकर यांचे गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी पहाटे गोव्यातील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर अनेक कलाकारांना धक्का बसला असून, अभिनेता सयाजी शिंदे यांनीही नानांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले.

नानांच्या निधनाची बातमी आपल्याला सकाळी ७ वाजता समजली, असे सयाजी शिंदे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, निधनाच्या आदल्या दिवशीच नाना आणि सयाजी शिंदे यांच्यात चांगली बातचीत झाली होती. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी नानांच्या निधनाची बातमी ऐकणे हा मोठा धक्का असल्याचे सयाजी यांनी म्हटले.

- Advertisement -

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘कालच आमचं इतकं छान बोलणं झालं होतं…’
त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी गोव्यामध्ये होते. त्यांना नानांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर मोठा धक्का बसला. नानांचं जाणं हे शॉकिंग आहे. मला सकाळी 7 वाजता त्यांच्या निधनाची बातमी समजली अशी प्रतिक्रिया सयाजी शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सयाजी शिंदे आणि नाना पाटेकर हे खूप जवळचे मित्र होते. सयाजी शिंदे म्हणाले, “हे खरोखरच धक्कादायक आहे. कालच आमचे खूप छान बोलणे झाले होते आणि अचानक हे घडले. काय बोलावे हेच सुचत नाहीये. आज सकाळी 7 वाजता मला याबद्दल समजले. मी कामात असतानाच मला तो फोन आला.”

मला आज सकाळी 7 वाजता मेसेजद्वारे समजलं की असं असं घडलं आहे. मी इथेच काम करत होतो. ‘राणा’ चित्रपटाचे शूटिंग करत होतो, म्हणून मी गोव्यात आलो होतो. पाहिलं तर खरंच ती बातमी होती. मला विश्वास बसत नव्हता की सर्व बातम्यांमध्ये ही जी बातमी आहे ती खरी आहे की खोटी आहे.” एक -दोन महिन्यांपूर्वी नानांसोबत शेवटचं बोलणं झालं होतं असंही सयाजी शिंदे यांनी बोलताना सांगितलं. नाना पाटेकर यांच्याबरोबर सयाजी शिंदे यांचे चांगले संबंध होते. नानांबरोबर त्यांनी अनेकदा काम केलं होतं.

नाना पाटेकरांसोबत नाम फाऊंडेशनमध्ये केलं काम
नाना पाटेकर यांच्याबरोबर सयाजी शिंदे यांचे खूप घनिष्ट संबंध होते. नानांबरोबर त्यांनी अनेक कलाकृतींमध्ये काम केलं होतं. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी ‘नाम फाऊंडेशन’ची सुरुवात केली. महाराष्ट्रातील दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि ग्रामीण भागातील पाणीप्रश्न या पार्श्वभूमीवर ही चळवळ उभी राहिली. यात सयाजी शिंदे यांनीही मोठा हातभार लावला होता.

VIDEO | Bambolim, Goa: Veteran actor Nana Patekar passes away at 75. Actor Sayaji Shinde says, “This is very shocking. I do not know what to say about it right now. I came to know about it at around 7 a.m. I was shooting in Kudal, so I immediately came to Goa to see for myself. I could not believe the news and was wondering whether it was true or false. So I came here…”

(Full video available on PTI Videos – https://t.co/bIyFWTfmBd)— Press Trust of India (@PTI_News) October 8, 2026

पहाटे नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर गोव्यातील डोना पाउला येथील त्यांच्या निवासस्थानी होते. गुरुवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले.
रुग्णालयातील डॉक्टरांनी नानांना वाचवण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे CPR देण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. डॉक्टरांनी सकाळी ५.२० वाजता त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती समोर आली आहे. नानांच्या मृत्यूची अधिकृत वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

नाना पाटेकरांची चटका लावून जाणारी एक्झिट
नाना पाटेकर त्यांच्या प्रभावी अभिनयासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांनी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला असून, ‘नटसम्राट’, ‘वजूद’, ‘वेलकम’, ‘यशवंत’ आणि ‘अब तक छप्पन’ यांसारख्या सिनेमांसाठी ते प्रसिद्ध आहेत. नाना पाटेकर यांनी 1978 मध्ये ‘गमन’ सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमाचं दिग्दर्शन मुझफ्फर अली यांनी केलं होतं आणि यात फारुख शेख, स्मिता पाटील यांच्या मुख्य भूमिका होत्या. सिनेसृष्टी आणि कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 2013 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. 2016 मध्ये, ‘नटसम्राट’ या मराठी सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रामतीर्थ येथे ध्वजारोहण सोहळ्याच्या...

0
नाशिक, दि. ३० ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : गोदावरीच्या पवित्र तीरावर उद्या, शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचा मंगलमय शुभारंभ होणार आहे....