Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Weather Update : राज्यभरात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; 'या'...

Maharashtra Weather Update : राज्यभरात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई | Mumbai

- Advertisement -

यंदा राज्यभरात ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत पावसाने (Rain) चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील धरणे (Dam) तुडूंब भरली असून या पावसामुळे शेतकऱ्यांनाही (Farmer) काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला देखील राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अदांज हवामान विभागाने वर्तवविला आहे.

हे देखील वाचा : Nashik News : पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी सदैव कटिबध्द – मंत्री छगन भुजबळ

पुढील तीन ते चार दिवस गुजरात किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या चक्रीवादळाने राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागाने (Meteorological Department) दिला आहे. तर दुसरीकडे आज हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज रेड आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! नाशिक-डहाणू नवीन मार्गाच्या अंतिम लोकेशन सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

दरम्यान, आज आणि उद्या पुणे, सातारा, नाशिक, नगर, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तर मराठवाड्यात ४ सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या जिल्ह्यांना (Districts) रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Vidhan Sabha Election 2024 : अजित पवारांची राष्ट्रवादी विधानसभेच्या ‘इतक्या’ जागा लढविण्यासाठी आग्रही

राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा

आजपासून ५ सप्टेंबरपासून पुढील सहा दिवसात काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात (Maharashtra Weather) आली आहे. यात मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भातील १८ जिल्ह्यांमध्ये तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत ३ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर दरम्यान आणि संपूर्ण मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत सोमवारी २ सप्टेंबर रोजी अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या