नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकराेड भागात (Nashik Road Area) भाजप (BJP) पक्षाची पदाधिकारी व राज्य माेलकरीन व असंघटीत कामगार संघाची अध्यक्ष असलेल्या संशयित महिला पदाधिकाऱ्याने गरजवंत महिलांना (Women) तब्बल १० लाख रुपयांचा गंडा घातला आहे. कमी अधिक रकमेची पेन्शन सुरु करुन देण्याचे अमिष व सरकारच्या विविध याेजनांना लाभ मिळवून देण्यासाठी अर्ज वितरित करण्याच्या माध्यमातू तब्बल १५०० महिलांकडून प्रत्येकी ६५० रुपये घेत हा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी संशयित मंगला भंडारी नामक महिलेसह संजय भालेराव यांना उपनगर पाेलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, याेजनांच्या नावाखाली सामान्यांना गंडा घालणाऱ्या या ‘स्कॅम’ ची व्याप्ती वाढणार असून फसवणूकीचा आकडा २० लाख रुपयांपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे.
हे देखील वाचा : Nashik Fraud News : शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवत सव्वा काेटी रुपये उकळले
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगला सतीष भंडारी (वय ४६, रा. गुलमाेहाेर काॅलनी, आनंदनगर, नाशिकराेड) व संजय संभाजी भालेराव (वय ४०, रा. गाैळाणे राेड, पाथर्डी फाटा) अशी संशयितांची नावे आहेत. दाेघांविराेधात चैताली प्रकाश गवांदे (वय ३५, रा. शिवकृष्णनगर, अरिंगळे मळा, नाशिकराेड) यांनी अपहार व फसवणूक केल्याची फिर्याद दाखल केली आहे. संशयित मंगला भंडारी ही गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकराेड भागात भाजप पक्षाच्या (BJP Party) संबंधित आघाडीचे कामकाज व सामाजिक कार्य करत असल्याचे भासवून महिला विकास सामाजिक संघटना चालवित हाेती.
हे देखील वाचा : अटकेच्या भीतीनं पूजा खेडकर फरार?परदेशात पसार झाल्याचा अंदाज; पोलीसांकडून शोध सुरु
त्यासाेबतच नाशिकराेडच्या दत्त मंदिर सिग्नलजळील सही प्लाझामध्ये भंडारी ग्लाेबल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड हे कार्यालय स्थापून अनेक गरजूवंत महिलांची भेट घेऊन त्यांना विविध शासकीय याेजनांची माहिती देत हाेती. दरम्यान, १ फेब्रुवारी ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत भंडारी व भालेराव यांनी ग्लाेबल सर्व्हिसेसच्या माध्यमातून तब्बल एक हजार पाचशेहून अधिक गरजू महिला व मजुरांना विविध शासकीय याेजनांना लाभ मिळवून देेऊ, माेफत ३० भांड्यांचा संच व ‘बांधकाम कामगार सुरक्षा पेटी’ याेजनेचा लाभ मिळवून देऊ, असे सांगत अर्ज नाेंदणी व अन्य ‘फि’ स्वरुपात प्रत्येक अर्जदार महिलांकडून ६५० रुपये उकळले. मात्र, अनेक महिने उलटूनही याेजनांमध्ये नाव न आल्याने व लाभ मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे महिलांना समजले. त्यापैकी चार ते पाच महिलांनी उपनगर पाेलिसांत (Upnagar Police) फिर्याद दिली आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : सराईत घरफाेड्या ताब्यात; १२ लाखांचे साेने हस्तगत
सीसीटीव्ही शाबूत
भंडारीच्या कार्यालयात सीसीटीव्ही बसविण्यात आले असून त्यातील फूटेज व डीव्हीआरचा ताबा पाेलीस घेणार आहेत. त्यातून महत्वाचे पुरावे, संगणक, कागदपत्रे ताब्यात घेऊन माहिती संकलित केली जाणार आहे. दरम्यान, याच कार्यालयात याेजनांसंबंधी व इतर बाबींची अनेक महत्त्वाची कागदपत्रे, रजिस्टर, वह्या, नाेंदी आढळून आल्या आहेत. त्यातील एका रजिस्टरमध्ये १५०० महिलांच्या नावासह नाेंदणी आढळून आली आहे. तर, अन्य रजिस्टरमध्येही शेकडाे नावाच्या नाेंदी सापडल्या आहेत. सध्या १५०० महिलांची ९ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे कागदपत्रांवरुन समाेर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती व त्यातील फसवणुकीची रक्कम व साक्षीदारांची संख्या वाढणार आहे.
गुन्हा नाेंदविला असून संशयित महिलेसह एका व्यक्तिस अटक केली आहे. पाेलीस काेठडीतील तपासानंतर अनेक मुद्दे समाेर येतील. सरकारी याेजना व पेन्शन सुरु करुन देण्यासाठी अर्ज नाेंदविण्यात आले आहेत. कळवण, येवला, नांदगाव, सिन्नर, नाशिक, इगतपुरी, वाडीवऱ्हे आदी तालुक्यांतील महिलांची फसणूक झाली आहे. सखाेल तपास केला जाईल. कार्यालयाची झडती घेऊन ते सील केले जाईल.
जितेंद्र सपकाळे, वरिष्ठ पाेलीस निरीक्षक, उपनगर
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा