Sunday, May 19, 2024
Homeधुळेस्त्री बाह्य सौंदर्याने नव्हे तर कर्तव्याने सौंदर्यवान असावी!

स्त्री बाह्य सौंदर्याने नव्हे तर कर्तव्याने सौंदर्यवान असावी!

दोंडाईचा Dondaicha । श.प्र.

स्त्री (woman) ही बाह्य सौंदर्याने (beautiful) नव्हे तर ती कर्म व कर्तव्याने (duty) अधिक सौंदर्यवान असावी, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील (Deputy Collector Hemangi Patil) यांनी केले.

- Advertisement -

जिल्हा नाभिक हितवर्धक संस्था महिला मंडळ (Nabhika hitavardhaka sanstha mahila maṇḍaḷ) व अखिल भारतीय जिवा सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकताच श्री. संतसेना मंगल कार्यालय देवपुर येथे नाभिक समाजाच्या महिलांसाठी प्रबोधन व हळदी कुंकू (turmeric kumkum )कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील (Deputy Collector Hemangi Patil) यांनी केले. श्री.संतसेना महाराज यांचे प्रतिमापुजन डॉ. भुमिका बिरारी व नगरसेविका सुमन वाघ यांच्या हस्ते झाले. तसेच शुरवीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पुजन अखिल भारतीय जिवा सेनेच्या उत्तर महाराष्ट्र संघटक रंजना सुर्यवंशी यांनी केले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्या सपना बिरारी यांनी केले.

प्रमुख पाहुणे म्हणुन डाँ.भुमिका बिरारी, उप जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, प्रा. सपना बिरारी, रंजना सुर्यवंशी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी प्रबोधनात्मक मनोगते व्यक्त केली. त्यात डॉ.भुमिका बिरारी यांनी महिलांनी (woman) चुल व मुल या संकल्पनेतुन बाहेर येवून प्रगती साधावी, असे आवाहन केले. तर सासु-सुन यांनी आई- मुली सारखे जगावे व वागावे तरच समाजात घटस्फोट (Divorce) कमी होतील, असे मत प्रा.सपना बिरारी यांनी व्यक्त केले.

महिलांनी एकमेंकाना हळदी कुंकू दिला. प्रसंगी जेष्ठ मातांचा सत्कार (Hospitality) करण्यात आला. मनोरंजनासाठी संगीत खुर्ची खेळ घेण्यात आला. भेट वस्तुही देण्यात आल्या. सुत्रसंचलन नाभिक हितवर्धकच्या जिल्हाध्यक्षा त्रिवेणी सोनवणे यांनी केले. तर आभार जिवा सेनेच्या जिल्हाध्यक्षा मनिषा चित्ते यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.त्रिवेणी सोनवणे, मनिषा चित्ते, वैशाली सैंदाणे, सौ.छाया महाले, संध्या सैंदाणे, अनिता सैंदाणे, ज्योती महाले, भावना सोनवणे, कल्याणी ठाकरे, मिनाक्षी बोरसे, गीता खोंडे, प्रितम सुर्यवंशी आदी महिलांनी परिश्रम घेतले. तसेच सुभाष शिरसाठ, दिनेश महाले, भगवान चित्ते, उमेश महाले, बापु सैंदाणे, सुधीर महाले, अमृत महाले, छोटू सोनवणे, राजु चित्ते, शंकर सैदाणे, मनोहर वारूडे, मनोज पगारे, वंसत चित्ते, मनोज बोरगावकर आदींनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या