Thursday, May 9, 2024
Homeजळगावलिफ्टचा पाईप डोक्यात कोसळून तरुणाचा मृत्यू

लिफ्टचा पाईप डोक्यात कोसळून तरुणाचा मृत्यू

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

बांधकामाच्या साईटवर (construction site) सहाव्या मजल्यावर स्लॅब भरण्यासाठी (slab filling) लोखंडी पाईप (Iron pipe) लाकडाची बनविलेल्या लिफ्टाचा पाईप तुटून (lift pipe broke) तो मजूराच्या (labour) डोक्यात कोसळल्याने (falling on the head) प्रथमेश संतोष वाघ (वय-20, रा. खेडी खुर्द) याचा मृत्यू (death) झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी मेहरुण तलाव परिसरात घडली. तसेच त्याच्यसोबत काम करणारा दीपक जयप्रकाश पाटील हा मजूर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी बांधकाम ठेकेदार (Construction contractor) भागवत सोनवणे, शिवा सोनवणे यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील मेहरुण तलाव परिसरात अनिश शहा यांच्या सहा मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामाच्या साईटवर प्रथमेश वाघ याच्यासह इतर मजूर काम करीत होते. सहाव्या मजल्यावरील स्लॅब भरायचा असल्याने खालच्या मजल्यावरुन सहाव्या मजल्यापर्यत बांधकामाचे साहित्य चढविण्यासाठी सोमवारी मजूरांनी लाकडी बांबू व लोखंडी गंजलेल्या पाईपांच्या सहाय्याने लिफ्ट बनविली होती. तयार करण्यात आलेली लिफ्ट कमकुवत असून त्यामुळे काहीही घटना घडून धोका निर्माण होवू शकतो. याबाबत काम करणार्‍या मजूरांनी ठेकेदाराला पुर्वकल्पना दिली होती. मात्र ठेकेदार भागवत सोनवणे व शिवा सोनवणे यानी त्यांनी सांगण्याकडे दुर्लक्ष केले.

ठेकेदारांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

ठेकेदारच्या दुर्लक्षामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याने याप्रकरणी राकेश सखदेव बाविस्कर (रा.खेडी खुर्द) या तरुणाच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात ठेकेदार भागवत सोनवणे, शिवा सोनवणे यांच्यासह बांधकाम ठेकेदाराविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे व हवालदार सचिन मुंडे तपास करीत आहे.

परंतु ठेकेदाराने दिले नाही लक्ष

बांधकामाचे साहित्य सहाव्या मजल्यावर चढवित असतांना तयार केलेली लिफ्ट दोन ते तीन वेळा हालायला लागली. हा प्रकार मजूरांनी ठेकेदाराच्या लक्षात आणून दिला. परंतु ठेकेदारने त्याकडे लक्ष न देता त्याने मजूरांना काम सुरु ठेवण्याबाबत सांगितले.

एकाचा मृत्यू, दुसर्‍याची प्रकृती गंभीर

बांधकामाचे साहित्य सिमेंट व खळीची ट्रॉली भरुन सहाव्या मजल्यावर पोहचविल्यानंतर अचानक लिफ्टचा लोखंडी पाईप तुटून प्रथमेश वाघ व दीपक पाटील यांच्या डोक्यात कोसळला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना प्रथमेश वाघ याच प्राणज्योत मालवली. तर दीपक याची प्रकृती गंभीर आहे. प्रथमेशच्या मृतदेहाचे मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करुन त्याचा मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या