Saturday, September 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजडोक्यावर हातोडी मारून तरुणाची हत्या

डोक्यावर हातोडी मारून तरुणाची हत्या

संशयित आरोपीस अटक

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

- Advertisement -

इगतपुरीतील जोगेश्वरी परिसरात काल सायंकाळी उमंग हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर हॉटेलचे काम सुरू होते त्यावेळी एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली.

प्रद्युम्न रामधनी चव्हाण, वय ३४ रा. हसवर, जि. आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याच्या डोक्यावर, कपाळावर आणि चेहऱ्यावर लोखंडी हातोडीने जोरदार वार केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर मयताचा भाऊ रणजीत रामधनी चव्हाण याने इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या हत्ये मागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव व पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने यांनी घटनास्थळी आपल्या पथकासह जाऊन पंचनामा केला. इगतपुरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपी जनकराम चव्हाण याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक करीत आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १२ सप्टेंबर २०२६ – शेतकरीवर्गासाठी कडवट निर्णय

0
भारत हा कृषिप्रधान देश असल्याचा अभिमान आपण बाळगतो; परंतु देशाच्या अर्थकारणात आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये अन्नदाता असलेला शेतकरी नेहमीच दुर्लक्षित राहतो. शेतकर्‍याने उत्पादित केलेला कांदा...