मुंबई | Mumbai
गद्दार उपमुख्यमंत्र्यांसारखे ( एकनाथ शिंदे ) एवढे एहसान फरामोश, नमकहराम आणि अशी निर्लज्ज व्यक्ती मी पाहिलेली नाहीत. एकनाथ शिंदे यांचा चेहरा कुणालाही माहिती नसताना उद्धव ठाकरे यांनी वरती आणले. आमदारकी, मंत्रिपद, नगरविकास खाते दिले. मग ह्यांनी आमचे सरकार पाडले. एवढे सगळे करून तुम्हाला कणभर सुद्धा लाज नाही, असा संताप आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना आज सभागृहात प्रस्ताव 293 अन्वये प्रस्ताव मांडला, मात्र यावेळी बोलताना त्यांना अडवणूक करण्यात आल्याने विरोधक चांगलेच संतप्त झाले. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर येत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाकरेंवर सातत्याने केल्या जाणाऱ्या टीकेवर घणाघाती प्रहार केला. तर, भास्कर जाधव यांच्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनीही एकनाथ शिंदेंवर गद्दार, नमक हराम, अहसान फरामोश म्हणत जोरदार टीका केली.
इतके नमक हराम, गद्दार, एहसान फरामोश व्यक्ती पाहिले नाही
परवा सभागृहात चड्डी बनियन गँगच्या लोकांनी जे काही ओम भट स्वाह: केले ते आपण सर्वांनी पाहिलेय. म्हणूनच मी हातवारे केले, टाचण्या-टोचण्याबाबत हो केले मी हातवारे, माझ्यावर करा कारवाई असे म्हणत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. उपमुख्यमंत्र्यांइतके नमक हराम, गद्दार, एहसान फरामोश व्यक्ती पाहिले नाहीत. यांच्यासारखा निर्लज्ज व्यक्ती मी आयुष्यात पाहिला नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी थेट नाव न घेता एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. आम्ही अनेक मुद्दे आणि प्रश्न सभागृहात उपस्थित केले, आम्ही जे विषय मांडले त्यावर नगरविकास मंत्री फक्त आणि म्हणून आणि म्हणून (अॅक्टींग केली) बोलले. म्हणूनच, तोंडवर गद्दार आणि नमक हराम बोललो. या मिंदेंचे नाव कुठेही घेतले नव्हते, पिच्चर वैगरे सर्व खोटे आहे.
नगरविकास मंत्री फक्त म्हणून, म्हणून, म्हणून एवढेच बोलतात
आदित्य ठाकरे म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही. आम्ही विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर सरकारकडून पाहिजे. आम्हाला जनतेला उत्तर देणे भाग पडते. धारावीत जगातील सर्वात मोठा जमीन घोटाळा, बेस्ट संपत चालली आहे, शिक्षणाची वाट लागली आहे. आरोग्य खात्याचे वाटोळे केले. हे सगळे मुद्दे मी २९३ च्या भाषणातून मांडले आहे. पण, नगरविकास खात्याचे मंत्री फक्त, ‘म्हणून, म्हणून, म्हणून…’ एवढेच बोलतात. हे कुणी ऐकलेच नाही. कारण, एवढे घाणेरडे भाषण आणि रटाळपणा ऐकण्यासाठी मी आलो नाही.”
यांना जराही लाज वाटत नाही
उद्धव ठाकरे सरकारने सर्व दिले, यांना कोण ओळखत तरी होते का? या आधीच्या सरकारने आपण माहिती घ्या, मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खाते कोणाला कधी दिलये का?. पण, याना दिले यांनी काय केले तर गद्दारी. यांना जराही लाज वाटत नाही, ज्या व्यक्तीने एवढे सगळे दिले त्यांच्यावर आरोप करता. काही संस्कार झाले आहेत की नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी नाव न घेत थेट एकनाथ शिंदेंवर जोरदार प्रहार केला. डोळ्यात डोळे घालून आरोप करा म्हटले. मात्र, तिही त्यांच्यात हिंमत नाही, खाली बघूनच बोलतात, असा टोलाही आदित्य यांनी लगावला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





