Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशमंगळवारच्या भारत बंदला ‘आप’चा पठिंबा

मंगळवारच्या भारत बंदला ‘आप’चा पठिंबा

नवी दिल्ली

- Advertisement -

केंद्र सरकारने नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी 8 डिसेंबर ला होणार्‍या भारत बंदला आम आदमी पार्टीने पाठिंबा दिला आहे. आपचे नेते गोपाल राय

यांनी आज ही घोषणा केली. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि मआपफचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्य कार्यकर्त्यांना आणि पदाधिकार्‍यांना या भारत बंदला पाठिंबा देण्याच्या सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

आपला देश शेतीप्रधान आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातले शेतकरी केंद्राने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. या थंडीच्या दिवसात त्यांच्यावर रस्त्यांवर झोपण्याची वेळ आली आहे. चर्चेच्या नावाखाली सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे. एकिकडे शेतकरी हे कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत.

तर दुसरीकडे सरकारकडून अजूनही या कायद्यांचे फायदे सांगितले जात आहेत. जे शेतकरी पीक पिकवतात त्यांनाच त्यांच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट आहे, ते माहिती असते. त्यामुळे या भारत बंदला नागरिकांनीही पाठिंबा द्यावा, असे आवाहन मी करेन असे गोपाल राय म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या