Monday, October 14, 2024
Homeक्रीडाIND vs BAN : जडेजा - आर अश्विनने सन्मान राखला! पहिल्या दिवसाअखेर...

IND vs BAN : जडेजा – आर अश्विनने सन्मान राखला! पहिल्या दिवसाअखेर भारताच्या ६ बाद ३३९ धावा; आर अश्विनचे विक्रमी शतक

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने ६ गडी बाद ३३९ धावा केल्या आहेत. तर आर अश्विन नाबाद १०२ आणि रवींद्र जडेजा नाबाद ८६ धावांवर खेळत आहेत. बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत १४४ धावांवर भारताचे ६ फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर रविंद्र जडेजा आणि आर अश्विनची जोडी मैदानावर जम बसवत बांग्लादेशच्या टीमला चांगलाच घाम फोडला. टीम इंडियाचे ओपनिंग फळीतील दिग्गज फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने टीम संकटात असताना अश्विन आणि जडेजा हे दोघे खऱ्या अर्थाने टीम इंडियाचे संकटमोचक ठरले. पहिल्या दिवसाअंती भारताने तब्बल ३३९ धावांची आघाडी घेतली.

चेन्नईच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याचा पहिला दिवस संपुष्टात आला. यात सुरुवातीला बांगलादेशच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाची फलंदाजी ढासळली, पहिल्या १० ओव्हरमध्ये विराट कोहली (६) , रोहित शर्मा (६) आणि शुभमन गिल (०) या तिघांची विकेट पडली. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंतने टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यशस्वीने ५६, ऋषभ पंतने ३९ तर केएल राहुलने १६ धावांची कामगिरी केली. त्यानंतर केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल काही करतील अशी अपेक्षा होती. पण जयस्वालने ११८ चेंडूत ५६ धावा केल्या आणि तंबूत परतला. तो बाद होत नाही तोच केएल राहुलची खेळी १६ धावांवर संपुष्टात आली.

- Advertisement -

बांगलादेशकडून हसन महमूदने सर्वात चांगला स्पेल टाकला. त्याने आघाडीच्या महत्वाच्या विकेट्स घेतल्या. नहीद राणा आणि मेहदी हसन मिराजने प्रत्येकी एक गडी बाद केला. पण त्यांना आर अश्विन आणि रवींद्र जडेजा ही जोडी काय फोडता आली नाही.

आर अश्विनचे शानदार शतक
भारतीय संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडला, तेव्हा तेव्हा आर अश्विनने भारतीय संघाच्या मदतीला धावला. कसोटीत गोलंदाजी करताना आर अश्विन नेहमीच हिट ठरतो. मात्र यावेळी त्याने फलंदाजीत बांग्लादेशी गोलंदाजांना घाम फोडला आहे. ज्या खेळपट्टीवर शुभमन गिलला खातेही उघडता आले नाही. त्याच खेळपट्टीवर अश्विनने आपल्या कारकिर्दीतील दुसरे वेगवान अर्धशतक झळकावले. त्यानंतरही त्याने ही शानदार खेळी सुरु ठेवली. अश्विनच्या कारकिर्दीतले हे ६ वे शतक ठरले आहे. यापुर्वी त्याने कसोटीत ५ शतके आणि १४ अर्धशतके झळकावली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या