Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआषाढीची भावदिंडी : भाग १९ - विठोबा आणिला चौबारात…

आषाढीची भावदिंडी : भाग १९ – विठोबा आणिला चौबारात…

नंदन रहाणे

मित्र असणे हे माणसाला मिळालेले मोठे वरदान आहे. रोजच्या जगण्यात आपण अनेक कटकटींना सामोरे जातो. व्यवहारी जगात वावरताना जो तो आपल्या स्वार्थासाठी ओढाताण करतोच. त्याचे जाच, ताण आणि दाब यामुळे प्रत्येक जण कावलेला असतो. साहजिकच आपल्या मनात जे जे काही साचते ते मोकळे करण्यासाठी माणसाला मित्र लागतो. अपयशाचे दु:ख, स्पर्धेत न टिकल्याची खंत, प्रत्यनात कमी पडल्याचे वैफल्य, विश्वासघाताची चीड, अनपेक्षिताचा हल्ला, नात्यांचा फोलपणा याबद्दल भरभरून बोलायचे असते ते फक्त मित्राजवळच ते आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, मेव्हणा, सासू, सासरा यांच्याकडे सांगता येते नाही. तिथे चिंता आणखी वाढवणार्‍या प्रतिक्रिया मिळतात. फक्त मित्रच पहिल्यांदा पाठीवर हात ठेवून धीर देतात, दिलासा देतात. मदतीचे नुसते आश्वासनच नाही, तर वचनही देतात. मग पुढे हिंमत बांधून माणूस नव्या लढाईला तयार होतो. शेवटी ज्याची त्याची झुंज ज्याला त्यालाच द्यायची असते. पण कोणीतरी आपल्या पाठीशी आहे हा विश्वास फार मोठा असतो.

- Advertisement -

या व्यवहारी जगात ‘मित्र’ ही संज्ञा फार सवंगपणे वापरली जाते. जे कोणी आपल्या जवळचे आहेत असे आपल्याला वाटते त्या प्रत्येकाला ‘मित्र’ मानणे वा म्हणणे हे फारच सरधोपटपणाचे होते. काहींच्या मनात कुतूहल असते. काहींना मौजमजा करायची असते. काहींकडे जे नसते ते त्यांना हवे असते, काहींच्या पुढे अवघड प्रश्न असतात. काहींना त्यांची गरज भागावायची असते तर काहींसाठी मित्र हा फक्त ‘टाईमपास’ असतो. हे सगळे एकवेळ परवडले, पण काहींना विश्वासघातासाठी संगत सोबत पाहिजे असते हे अतिशय वाईट! एखाद्याचा विश्वास संपादन करायचा आणि त्याचे धन हस्तगत करायचे; मात्र ठरलेल्या वेळीच नव्हे तर पुढे कधीही त्याचे ते देणे परत करायचेच नाही, असाही विकृत स्वभाव काही दृष्टांचा असतो. त्यांचा बदललेला रंग पाहून, भाबड्या मनाला अपार यातना होतात. मग ते कायमचेच संबंध तोडून टाकतात. मात्र, एखादा असा खमक्या निघतो की, तो कठोर घेणेकरी बनून, विश्वासघाती अमित्राला फरफटत

YouTube video player

बाजारात आणतो!
यादवांचे कुळीं झोंड जे जन्मले ।
नाही ऐसे केले ।
माग पुढे ॥1॥
देई गा विठोबा आमुचे ठेवणे ।
सकळांची ऋणे ।
नेत्रो पाहसी ॥2॥
आमुचे जे साधू आहेत सज्जन ।
तुमचा जमान ।
कोठे देवा ॥3॥
नामयाचा महादा
बळकट पै जाला ।
विठोबा आणिला ।
चौबारात ॥4॥

नामदेवरायांचे सर्वात धाकटे सुपुत्र महादेव यांचा हा अभंग व ती भूमिका आहे. ते क्रोधाने खवळलेच आहेत आणि घेणेकर्‍यांच्या आवेशात थेट देवालाच भिडले आहेत का? तर तो झोंडपणा करतो आहे! म्हणजे काय? भक्तांनी जे प्रेम त्याला दिले, त्याची परतफेड करण्याची त्याची वृत्तीच नाही! तो चक्क बदलून पडला आहे म्हणून महादाने त्याच्याशी भांडण मांडलेय. त्याला लोकांपुढ्यात खेचून महादा काय म्हण तो पाहा – लोकहो, यादवांच्या कुळात जन्मलेल्या या नाठाळाने आम्हाला असे केले आहे की, ना धड मागेही जाता येईना वा पुढेही सरकता येईना! जगूच नये असे वाटू लागले इतके याचे काळे धंदे! ऐ विठोबा, माझ्या वाडवडिलांनी जे ठेवणे विश्वासाने तुझ्या हाती दिले होते ते बर्‍या बोलाने परत कर… सगळ्यांकडून कर्ज घेतोस आणि ते फेडणे जाणतच नाहीस तू… लोकांना फसवणे, बुडवणे हाच तुझा धंदा झाला आहे! आमचे जे संतसज्जन आहेत, ते बिचारे अगदी साधुस्वभावाचे असल्याने तू गैरफायदा घेतलास… मात्र, मी कुणी लेचापेक्षा नाही, पक्का मुरलेला आहे. मी कुठे तुझा विश्वास धरू? बर्‍या बोलाने ताळ्यावर येतोस की नाही?

महादा इतके बोलला आणि त्याने ताकदीने अवसान आणून विठोबाला गाभार्‍यातून खेचले, मंदिरातूनही बाहेर ओढले आणि थेट बाजारापेठेच्या चौकात आणून त्याची इज्जत काढली! असे धाडसी भक्त फक्त वारकरी संप्रदायातच!

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...