Sunday, May 19, 2024
Homeधुळेअबब! तब्बल 72 कर्मचारी ‘लेट लतिफ’

अबब! तब्बल 72 कर्मचारी ‘लेट लतिफ’

धुळे Dhule । प्रतिनिधी

धुळे महापालिकेच्या (Municipal Corporation) विविध विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना शिस्त (Discipline to officers and employees) लागावी या अनुशंगाने आज सकाळी अचानकपणे प्रवेशद्वारावर तपासणी (Check) करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या विभागातील तब्बल 72 कर्मचारी निर्धारीत वेळेपेक्षा उशिरा (Late than scheduled) आल्याचे आढळून आले. ऐव्हढ्या मोठ्या संख्येने उशिरा येणे म्हणजे कर्मचार्‍यांवर जणू कुणाचा धाक राहिला आहे की नाही? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.

- Advertisement -

नेहमीच चर्चेत असणार्‍या महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे या ना त्या कारणाने निघत असतात. बर्‍याचदा महासभा, स्थायी समितीच्या सभांमध्ये सदस्यांच्या वतीने अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मुजुरीपणाबद्दल तक्रारी होतात. प्रशासन आपल्या पध्दतीने कामकाज करीत असले तरी आपल्या यंत्रणेला शिस्त लावण्याची जबाबदारी देखील प्रशासनाची असते. अधिकारी, कर्मचार्‍यांचे कामावर उशिरा येण्याचे प्रमाण वाढीस लागल्यामुळे आज उपमहापौर तथा प्रभारी महापौर अनिल नागमोती, उपायुक्त डॉ.सुनंदा नांदुरकर यांनी सकाळी 10.30 वाजता महापालिकेचे प्रवेशद्वार बंद करुन ते स्वतः खुर्ची टाकून बाहेर बसलेत. त्यानंतर कार्यालयात उशिरा येणार्‍यांना प्रवेशद्वारावरच हटकण्यात आले. यात थोडे न थाकडे तब्बल 72 कर्मचारी उशिरा आल्याचे निदर्शनास आले. या कर्मचार्‍यांमध्ये विरोधी पक्षनेता कार्यालयातील कर्मचार्‍यांसह लेखाविभाग, मालमत्ता विभाग, लेखापरिक्षण, नगररचना, लेखा परिक्षण, विद्युत, मुख्यटपाल, पाणीपुरवठा, बांधकाम आणि मालमत्ता विभागातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या सर्व कर्मचार्‍यांच्या हजेरी पुस्तकावर आज लेटमार्क लावण्यात आला आहे. नागरिसेवा अधिनियमानुसार तीन वेळा उशिरा येणार्‍या कर्मचार्‍याची अर्धा दिवस रजा पकडली जाते. त्यानंतरही ते उशिरा आल्यास तेव्हढेदिवस बिनपगारी रजा लावली जाते. परंतु पुन्हा पुन्हा उशिरा येणार असेल अथवा नियमांचे उल्लंघन होत असेल तर अशा कर्मचार्‍यांविरुध्द नियमानुसार कारवाई करण्यात येते. या कर्मचार्‍यांनाही नोटीस बजावण्यात आली असून त्यांचा खुलासा मागविण्यात येईल. त्यानंतर हा अहवाल आयुक्त आणि महापौरांसमोर सादर करण्यात येवून उशिरा येणार्‍या या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्तांनी सांगितले.

सक्त कारवाई करणार

नागरिसेवा अधिनियमाचे उल्लंघन करीत हे कर्मचारी सकाळी 10.30 वाजेच्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा आले आहेत. त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार असली तरी उशिरा येण्याबाबतच्या नोटीसा बजावण्यात येणार आहे. आज त्यांचा लेटमार्क लावण्यात आला असून या सर्व कर्मचार्‍यांवर सक्त कारावई केली जाईल.

-डॉ.सुंनदा नांदुरकार, उपायुक्त मनपा

- Advertisment -

ताज्या बातम्या