Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्याजुन्या शिवसेनेचा कुठलाही वाण आला तरी शिंदेंच्या बाणापुढे फिक्काच; अब्दुल सत्तारांचा टोला

जुन्या शिवसेनेचा कुठलाही वाण आला तरी शिंदेंच्या बाणापुढे फिक्काच; अब्दुल सत्तारांचा टोला

मुंबई | Mumbai

आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि आमदारांच्या सत्काराचे आयोजन केले होते. मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले. यात शिंदे सरकारमधील (Shinde Government) आमदारांनी उपस्थिती लावली होती…

- Advertisement -

यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले की, जगातील कुठल्याही राज्यात मुख्यमंत्री (Chief Minister) होणार नाही, असा मुख्यमंत्री आपल्याला लाभला आहे. आपण कुठलीही गोष्ट लपवून करत नाही.

माझ्या मतदारसंघात हिंदू मतदारांची लोकसंख्या जास्त आहे पण मला ते निवडून देतात. आपली शिवसेना ओरिजनल आहे आणि जुन्या शिवसेनेचा (Shivsena) कोणताही वाण आला तर शिंदेच्या बाणापुढे टिकू शकणार नाही.” असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला आहे.

शिंदे यांनी रात्री दोन वाजता माझ्या नगरपालिकेसाठी २० कोटींचा निधी (Fund) मंजूर केला. त्यांचे उपकार मी विसरणार नाही. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना पेन चालवण्यामध्ये अडचणी होत्या पण आता ती अडचण शिंदे यांनी सोडवली आहे. त्यांच्या उपकाराची परतफेड आम्ही करू शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

आता आम्हाला लाभलेला जनसामान्यांना न्याय देणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे. कारण आतापर्यंत लेना बँका बघितल्या पण महाराष्ट्रातील देना बँक म्हणजे शिंदे साहेब, असे म्हणत सत्तार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या