Sunday, February 22, 2026
HomeनगरAbhishek Kalamkar case : नगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा...

Abhishek Kalamkar case : नगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल

अहिल्यानगर । प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अहिल्यानगर शहर प्रमुख तथा माजी महापौर अभिषेक कळमकर याच्या विरोधात अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. एमआयडीसी पोलीस ठाणे येथे हा गुन्हा नोंदविण्यात आला असून, संशयित अभिषेक कळमकर याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत पुणे जिल्ह्यातील एका 25 वर्षीय विवाहित महिलेने शनिवारी पहाटे फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित महिला खासगी कामानिमित्त अहिल्यानगर येथे आली होती. सोशल मीडियावरून तिने अभिषेक कळमकर याचा मोबाईल क्रमांक मिळवून नोकरीसंदर्भात संपर्क साधला.

- Advertisement -

अभिषेकने तिला कुष्ठधाम रोड परिसरात बोलावून शिक्षणाची चौकशी केली आणि नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर काही दिवसांनी अभिषेकने एमआयडीसी परिसरात आपली शाळा असल्याचे सांगून शाळा दाखविण्याच्या बहाण्याने तिला बोलावले. दुसर्‍या दिवशी महिला अहिल्यानगर येथे आल्यानंतर अभिषेकने तिला केडगाव बाह्यवळण रस्त्यावर उतरायला सांगितले. तेथून काळ्या रंगाच्या वाहनात बसवून एमआयडीसीकडे घेऊन गेला. वाहनात असताना तिला शीतपेय दिल्यानंतर गुंगी आल्यासारखे झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर सुमसाम ठिकाणी वाहन थांबवून जबरदस्ती केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच, या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास नोकरी मिळणार नाही, अशी धमकी दिल्याचेही तिने म्हटले आहे.

YouTube video player

महिला घाबरलेल्या अवस्थेत असल्याने तिने तत्काळ कोणालाही माहिती दिली नाही. मात्र 18 फेब्रुवारी 2026 रोजी अभिषेकने व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून तिला शिरूर (जि. पुणे) येथील मारवेल हॉटेल येथे बोलावले. हॉटेलच्या रूम क्रमांक 110 मध्ये बोलावून दरवाजा बंद करून नोकरीची चिंता करू नकोस, सर्व खर्च पुरवेल, असे सांगत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पीडितेचा विरोध असतानाही जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच या कृत्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून संबंधाबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भांबळ करीत आहेत. पोलीस अभिषेकचा शोध घेत आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 38 हजार 737 नोकरदारांनी घेतले सरकारचे ‘मोफत धान्य’

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मिशन सुधार योजनेअंतर्गत राज्य शासनाने जिल्हा पुरवठा विभागाला 5 लाख 98 हजार 237 लाभार्थ्यांची यादी पडताळणीसाठी दिली होती. पहिल्या टप्प्यात झालेल्या पडताळणीत...