Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar : गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी जिल्ह्यात अचानक छापे

Ahilyanagar : गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी जिल्ह्यात अचानक छापे

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात मुलींच्या घटत्या जन्मदराच्या पार्श्वभूमीवर गर्भलिंग चाचणी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. याअंतर्गत सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांवर अचानक छापे टाकण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत लिंग गुणोत्तर, साथरोग परिस्थिती, जन्म-मृत्यू नोंदणी व क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

- Advertisement -

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते. गर्भलिंग चाचणीविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सर्व सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची अचानक तपासणी करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करणे, संशयास्पद गर्भपातप्रकरणी सखोल चौकशी करणे, गरोदर मातांचा नियमित पाठपुरावा, लिंगनिदानविषयी जनजागृती मोहिमा राबविणे, गर्भपातासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांच्या विक्रीवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत नियमित देखरेख ठेवणे अशा उपाययोजना तात्काळ राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिले.

YouTube video player

पावसाळा सुरू झाल्याने सध्या जिल्ह्यात डेंग्यूसह विविध साथींचा धोका लक्षात घेता खासगी डॉक्टरांनी डेंग्यू निदान झालेल्या रूग्णांची माहिती शासकीय यंत्रणेला वेळेत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. माहिती लपवणार्‍या वैद्यकीय व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचा इशाराही डॉ. आशिया यांनी दिला. सर्व खासगी डॉक्टरांनी क्षयरोग रूग्णांची माहिती सरकारी यंत्रणेला देणे अनिवार्य आहे. उपचार प्रक्रियेत सरकारी मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, लिंग गुणोत्तर सुधारणा, साथरोग नियंत्रण व अचूक नोंदणी या बाबतीत शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन काम केल्यासच योग्य परिणाम मिळू शकतो, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. आशिया व सीईओ भंडारी यांनी केले.

जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेवर भर
जन्म-मृत्यू नोंदणी बाबत जिल्हाधिकारी डॉ. आशिया व सीईओ भंडारी यांनी सविस्तर आढावा घेऊन सूचना केल्या. जन्म- मृत्यूची घटना ज्या कार्यक्षेत्रात होईल त्याच कार्यक्षेत्रात सदर घटनांची जन्म- मृत्यू नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक आहे. ज्या रूग्णालयामध्ये जन्म- मृत्यू होईल त्या रूग्णालयांनी सदर घटनांची नोंद करून अहवाल सादर करावा. तसे न केल्यास त्यांच्या विरूध्द कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...