Sunday, May 19, 2024
Homeजळगावजिल्हा बँक निवडणुकीत सत्तेचा दुरुपयोग

जिल्हा बँक निवडणुकीत सत्तेचा दुरुपयोग

जळगाव- jalgaon

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (District Bank Election) भाजपच्या (BJP) उमेदवारांच्या अर्जावर (Objections to the application) हरकती घेण्यात आल्या. त्या हरकतींवर कायदेशीररित्या उत्तर देवूनही अर्ज बाद (After application) करण्यात आले. त्यामुळे या निवडणूकीत सत्तेचा दुरुपयोग (Abuse of power) करुन स्वार्थापोटी महाविकास आघाडीने घात केल्याचा आरोप भाजपच्या (BJP) पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत (press conference) केला.

- Advertisement -

जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे अर्ज रिजेक्ट केल्यामुळे भाजपच्या उमेदवारांनी जी. एम. फाऊंडेशनमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. राजूमामा भोळे, आ. संजय सावकारे, माजी आ. स्मिता वाघ, जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, जि. प. सदस्य माधुरी अत्तरदे, चंद्रशेखर अत्तरदे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी उपस्थित होते.

पुढे बोलतांना आ. भोळे म्हणाले की, महाविकास आघाडीने सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून भाजपसोबत युती करण्याची तयारी होती. मात्र ऐनवेळी त्यांनी नकार दिला. तुम्हाला निवडणुक लढवायचीच होती तर युती करण्यास संमती दर्शवित बैठकीला का उपस्थित राहीले असेही ते यावेळी म्हणाले. जिल्हा बँक ही शेतकर्‍यांची बँक आहे मात्र याठिकाणी सत्ताधारी केवळ आपल्या सत्तेचा दूरपयोग करीत असल्याचे चित्र हे दिसून येत आहे.

भाजपच्या उमेदवारांचे अर्ज काहीही कारण सांगून बाद केल्यामुळे याप्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचेही आ. भोळे यावेळी म्हणाले. तसेच सर्व पॅनलसाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न केले. मात्र त्यांना देखील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व कॉंग्रेसने ऐनवेळी नकार दिल्याने त्यांना देखील यश आले नसल्याचे आ. यावेळी म्हणाले.

अर्ज वैध करण्यासाठी ५० हजारांची मागितली लाच

हकरतींवर सुनावणी झाल्यानंतर उमेदवाराला आपल्या अर्जावर निवडणुक निर्णय अधिकार्‍याच्या समोर अभिसाक्षी स्वाक्षरी करावी लागते. परंतु निवडणुक अधिकार्‍यांनी ही स्वाक्षरी न करताच तो फॉर्म घेतला यावेळी उमेदवार माधूरी अत्तरदे यांनी विनंती करुन देखील त्यांना अर्जावर सही करुन दिली नाही.

याउलट निवडणुक निर्णय अधिकारी बिडवाई यांनी उमेदवाराच्या पतीला ५० हजार द्या आम्ही तुमचा अर्जाची संपुर्ण पुर्तता करुन देतो असा आरोप बँकेच्या उमेदवार माधुरी अत्तरदे यांनी पत्रकार परिषदेत केला.

छाननी प्रक्रियेतनंतर दिवसभर जिल्हाबँकेत थांबून होते. त्यावेळी पर्यंत आमच्या अर्जावर कोणीही हरकत घेतली नाही. मात्र रात्रभरात आमच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या. त्यानंतर सकाळी आमचा अर्ज बाद झाल्याचे कळताच निवडणुक कार्यालयातच सावळा गोंधळ सुरु असल्याचा आरोप माजी आ. स्मिता वाघ यांनी केला.

ठिय्या आंदोलन

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी जि. प. सदस्या माधुरी अत्तरदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांच्या अर्जावर एकाही ठिकाणी सही नसल्याचे सांगत त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. त्यामुळे माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांनी निवडणुक कार्यालयातच गोंधळ घातला.

दरम्यान, सही करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. संतप्त झालेल्या अत्तरदे कुटुंबियांनी निवडणुक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करीत न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले. तसेच सर्व उमेदवारांचे अर्जांच्या प्रती देण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. यावेळी माजी आ. स्मिताताई वाघ देखील उपस्थित होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या