Sunday, October 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजACB : सहा लोकसेवकांसह दोन खाजगी इसमांना लाच स्वीकारताना अटक

ACB : सहा लोकसेवकांसह दोन खाजगी इसमांना लाच स्वीकारताना अटक


नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात ११,५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी एकाच वेळी तब्बल ८ जणांना रंगेहाथ पकडले. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील ६ लोकसेवक आणि २ खाजगी इसमांचा समावेश आहे. या धडक कारवाईमुळे नाशिक जिल्ह्यातील वनविभागात आणि शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दहेगाव पाटोदा (ता. येवला) येथील एका शेतकर्‍याने त्यांच्या शेत गट क्र. ६१ मधील सागाची झाडे तोडण्यासाठी वनविभागाकडे परवानगी मागितली होती. ही परवानगी मिळवून देण्यासाठी आरोपींनी १९ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ११,५०० रुपये स्वीकारण्याचे ठरले. १६ मे रोजी एसीबीने केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाली होती.

मंगळवारी (१९ मे) एसीबीच्या पथकाने येवला शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला. मुख्य आरोपी वनपाल भाऊसाहेब माळी याच्यासाठी वनरक्षक पंकज नागपुरे याने ५,००० रुपये स्वीकारले. तसेच उर्वरित आरोपी कनिष्ठ लिपिक प्रवीण भोसले, वनरक्षक आकाश कोळी, वनमजूर विजय लोंढे, रामनाथ भोरकडे आणि खाजगी डेटा ऑपरेटर निखिल आरणे व खाजगी चालक सुनील भुरुक यांनीही लाचेचा हिस्सा स्वतःसाठी स्वीकारला. पैसे स्वीकारतानाच एसीबीने या सर्वांना रंगेहात ताब्यात घेतले.

ही यशस्वी कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक पूनम केदार आणि प्रतिभा आबुज यांच्या पथकाने केली असून, आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

ताज्या बातम्या

Shrirampur : अखेर बेग, जेधे टोळीवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपूर येथील बेग, जेधे टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाईच्या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार...