Thursday, September 19, 2024
Homeनाशिकजेलमधील लाच प्रकरण : लाचखाेर सीएमओची मालमत्ता रडारवर

जेलमधील लाच प्रकरण : लाचखाेर सीएमओची मालमत्ता रडारवर

मुळगावी जाऊन एसीबी घेणार घरझडती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

नाशिकराेड मध्यवर्ती कारागृहातील (Nashik Road Central Jail) कैद्यास ‘फिटफॉर’ प्रमाणपत्र देण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या जेलच्या डॉक्टरांना न्यायालयाने (Court) एका दिवसाची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली. दरम्यान, दोघा लाचखोरांच्या घराची झडती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने साेमवारी घेतली. यात स्थावर मालमत्तेची कागदपत्रे सापडली असून त्यांच्या मुळगावी असलेल्या मालमत्तेचा शोध घेतला जात आहे. 

हे देखील वाचा : Nashik Suicide News : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची आत्महत्या

डॉ. आबीद आबू अत्तार (४०, रा. मध्यवर्ती कारागृह वसाहत, नाशिकरोड), डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार (४२, रा. इंदिरानगर, नाशिक) अशी लाचखाेरांची नावे आहेत. दोघे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत. कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यास फिटफॉर प्रमाणपत्र पाहिजे होते. त्यासाठी कैद्याच्या मालेगाव येथील मित्राने कारागृह रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे प्रमाणपत्राची मागणी केली असता, लाचखोरांची (Bribe Takers) ४० हजारांची मागणी केली होती.

हे देखील वाचा : Nashik News : पावसात फिरायला गेले आणि अडकले; अंजनेरी गडावरचा रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक Video आला समोर

दरम्यान, तडजोडी अंती ३० हजार देण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघा लाचखोर डॉक्टरांना ३० हजारांची लाच स्वीकारताना अटक केली. नाशिकरोड पोलिसात (Police) गुन्हा दाखल आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : दहशत माजविणाऱ्या गुंडांची टोळी गजाआड

मालमत्ता उघड हाेणार

सापळा झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघा लाचखोरांच्या घराची झडती घेतली. तेव्हा डॉ. अन्सारी याच्याकडे तीन साडेतीन लाख रुपयांची स्थावर मालमत्ता तर, डॉ. खैरनार याच्याकडे सात लाखांच्या स्थावर मालमत्तेची कागदपत्रे पथकाच्या हाती लागली आहे. परंतु या दोघाही लाचखोरांच्या मूळ गावी पथकांकडून त्यांच्या स्थावर मालमत्तेचा शोध घेण्यात येत आहे. तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत करीत आहेत. 

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या