भोकर |वार्ताहर| Bhokar
नेवासा तालुक्यातील सोनई येथील एका मंगल कार्यालयाजवळ झालेल्या आपघातात लेकाच्या पाठोपाठ सहाव्या दिवशी उपचार घेत असलेल्या पित्याचा ही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सतीष रखमाजी जाधव (वय 35), शिव जाधव (वय 4) असे अपघातात मृत्यू झालेल्या बाप-लेकाचे नाव असून मुलगी शिवन्या व पत्नी रेखा हे गंभीर जखमी आहेत.
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील हनुमानवाडी परिसरातील सतीष जाधव हे सासरवाडीला जात असताना सोनई येथील एका मंगल कार्यालयाजवळ त्यांच्या दुचाकीच्या अपघात झाला. या अपघातात शिवचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर सतीष जाधव, पत्नी रेखा, मुलगी शिवन्या हे गंभीर जखमी झाले होते. उपचारदरम्यान काल सहाव्या दिवशी सतीषची प्राणज्योत मालवली. त्यांच्यांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.