Tuesday, October 22, 2024
Homeमहाराष्ट्रAccident News : मद्यधुंद टेम्पो चालकाची सहा वाहनांना धडक; एक महिला ठार

Accident News : मद्यधुंद टेम्पो चालकाची सहा वाहनांना धडक; एक महिला ठार

पुणे | प्रतिनिधी | Pune

मद्यधुंद टेम्पो चालकाने (Tempo Driver) बेदरकारपणे वाहन चालवत सहा वाहनांना धडक (Collision) दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) एक महिलेचा (Woman) मृत्यू झाला. गीतांजली श्रीकांत अमराळे  (वय ३५, रा. शास्त्रीनगर) असे या महिलेचे नाव असून, त्यांचे पती श्रीकांत अमराळे हे गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालक आशिष अनंत पवार (वय २६, रा. गणपती माथा, वारजे) याला अटक केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापन करणार – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वे रोडवरील (Curve Road) करिश्मा चौकाकडून पौड फाटय़ाकडे टेम्पो भरधाव वेगाने जात होता. त्याने करिश्मा चौकाजवळ एका वाहनाला धडक दिली. त्यावेळी तेथील बाल तरुण मंडळाची आरती सुरू होती. तेथे जमलेल्या लोकांच्या शेजारुन टेम्पो भरधाव वेगाने पुढे निघून गेला. पुढे त्याने सिग्नलला रिक्षा, चारचाकी, दोन ते तीन दुचाकी वाहनांना धडक दिल्यामुळे काही जण जखमी (Injured) झाले. त्याचवेळी पौड फाटा चौकात दुचाकीस्वार श्रीकांत अमराळे हे पौड रोडवरुन कर्वेरोडला वळत होते. त्यावेळी टेम्पो चालक आशिषने त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली. त्यामुळे श्रीकांत यांची पत्नी गीतांजली अमराळे गंभीर जखमी झाल्या.

हे देखील वाचा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील (Area) एरंडवणा मित्र मंडळ, बाल तरुण मंडळ, अचानक मित्र मंडळाचे कार्यकर्ते धावून आले. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वी गीतांजली अमराळे यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. श्रीकांत अमराळे हे मनसेचे कार्यकर्ते असून शास्त्रीनगरमधील संगम मित्र मंडळाचे ते पदाधिकारीही आहेत.  गौरीसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी ते पत्नीबरोबर जात असताना हा अपघात झाला. त्यात गीतांजली अमराळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी अलंकार पोलीस (Police) अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा : Nashik News : ढोलपथकावर नियंत्रण; विसर्जन मिरवणुकीत नियम पाळण्याचे आदेश

कर्वे रस्ता मृत्यूचा सापळा

कर्वे रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून, काही दिवसांपूर्वी रसशाळा चौकात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार सेवानिवृत्त कृषी अधिकाऱयाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली होती. यात सुनील भास्करराव देशमुख (वय ६०, रा. निको गार्डन, विमाननगर) यांचा मृत्यू झाला होता. तर दोन महिन्यांपूर्वी जलसंपदा विभागातील निवृत्त अधिकाऱ्याचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना कर्वे रस्त्यावर घडली होती. जलसंपदा विभागातील निवृत्त अधिकारी सायकलवरुन कर्वे रस्त्याने चालले असताना डंपरने त्यांना धडक दिली होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या