Monday, December 2, 2024
Homeब्रेकिंग न्यूजकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

मुंबई | Mumbai

सध्या मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून भक्तांच्या दर्शनासाठी विविध मानाच्या गणपतीच्या ठिकाणी रांगा लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर (Mumbai Tour) आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी लालबागच्या राजाचे सपत्नीक दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारही उपस्थित होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : १३ तडीपार गजाआड; चार विशेष पथकांची कारवाई

त्याआधी शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी बाप्पाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी वांद्रे येथे जाऊन मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेतले.

हे देखील वाचा : Sharad Pawar Lalbaugcha Raja Darshan : अनेक वर्षांनंतर शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला; नात, जावयासह बाप्पाच्या चरणी झाले लीन

दरम्यान, शाह हे साधारण सकाळी ११.५५ च्या दरम्यान लालबागचा राजाच्या (Lalbaugcha Raja) दर्शनासाठी आले. यावेळी त्यांनी गणरायांच्या (Ganpati) मूर्तीला हात जोडून नमस्कार केला. यानंतर त्यांनी बाप्पााला नारळाचे तोरण अर्पण केले. तसेच त्याच्या चरणावर हळद, कुंकू आणि फुलंही वाहिली. त्यानंतर बाप्पााच्या पायावर डोकं ठेवत आशीर्वाद घेतला. यानंतर ते आपल्या पुढील नियोजित दौऱ्यासाठी रवाना झाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या