Monday, December 2, 2024
HomeनाशिकNashik News : ढोलपथकावर नियंत्रण; विसर्जन मिरवणुकीत नियम पाळण्याचे आदेश

Nashik News : ढोलपथकावर नियंत्रण; विसर्जन मिरवणुकीत नियम पाळण्याचे आदेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सणोत्सवांत (Festival) शायनिंगमध्ये निघणाऱ्या शहरातील विविध ढोलपथकांसह प्रमुखांना नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) कायद्याच्या चौकटींचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर नियमबाह्य पद्धत अंगिकारणाऱ्यांवर कारवाई होईल, असा इशाराही पोलिसांनी दिला. विविध ढोलपथकांत महिलांसह ५ ते ३० वयोगटांतील तरुण तरुणींची संख्या जास्त असते. त्यामुळे या प्रत्येक ढोलवादकाची जबाबदारी त्या-त्या ढोलपथक प्रमुखाची असेल. कोणत्याही ढोलपथकाने अतिउत्साह न दाखवता उत्सव शांततेत साजरा करावा. दोरखंड लावून कुठलाही मार्ग हेतुपुरस्सर व्यापू नये यासह अन्य सूचना शहर पोलिसांनी ढोलपथकांना दिल्या.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Ganeshotsav 2024 : वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा; शिंपी परिवाराने साकारला आकर्षक देखावा

आगामी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या (Immersion Procession) दिवशी भद्रकालीतील वाकडी बारव येथून मुख्य मिरवणूक सुरु होते. त्यात विविध देखावे, आरास व नानाविध ढोलपथके, लेझीमपथके कलेचे प्रदर्शन करतात. मात्र, ही कला सादर करतांना कुठेतरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सामान्य नागरिक आणि पादचाऱ्यांना अनेक अडचणी सहन कराव्या लागतात. त्यामुळे मिरवणुकीत सहभागी होणारी मंडळे, ढोलपथकांवर कायद्याचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या सूचनेने परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी रविवारी (दि.८) भद्रकाली पोलिस ठाण्यात ढोल-ताशा पथकांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पोलिसांनी पथक प्रमुखांना विविध सूचना करुन नियमात उत्सव साजरा होईल, यावर भर देण्यास सांगितले.

हे देखील वाचा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

यावेळी सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, सुरेश आव्हाड यांच्यासह सिंहगर्जना वाद्य पथकाचे प्रितम भामरे, शिवसाम्राज्यचे कुणाल भोसले, माऊली प्रतिष्ठानचे सर्जेराव वाघ, तालरूद्रचे रवींद्र राऊत, शिवतालचे नारायण जाधव, विघ्नहरणचे विरेन कुलकर्णी, स्वयंभूचे विपुल ढवण, सहस्त्रनादच्या अमी छेडा शिवसंस्कृतीचे अरुण मुंगसे, नटनादचे कुणाल आहिरे, आम्ही नाशिककवे अख्तर शेख यांच्यासह एकूण १६ वाद्य पथकाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी वाद्य पथकांनी आपापल्या सूचना व गा-हाणे मांडले. मराठी संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न वाद्य पथकांकडून केला जात आहे. ढोलपथके नाशिकची (Nashik) वेगळी ओळख बनू पाहत असल्याचे सांगितले. पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन सगळेच करतील. प्रशासनाला सहकार्य असेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : १३ तडीपार गजाआड; चार विशेष पथकांची कारवाई

ढोलवादकांसाठी सूचना

१) एकाचवेळी एक पथकाकडून ५० पेक्षा जास्त वाद्य वाजवले जाणार नाहीत.

२) कोणतेही ढोलपथक, बॅन्जोपथक हेएका ठिकाणी २० मिनिटांपेक्षा जास्त थांबणार नाही.

३) २० मिनिटांच्या आतमध्ये पथकाला पुढे काढण्याची जबाबदारी त्या गणेश मंडळाची असेल.

४) मिरवणुकीदरम्यान वादकांना पर्यायी वादकांचा बॅकअप ठेवावा.

५) वाद्यपथकांनी दोरखंडाचा वापर करताना भाविकांकरता जागा दोन्ही बाजूंनी सोडावी.

६) दोरखंड लावून रस्ता हेतुपुरस्सर व्यापून घेता कामा नये.

७) वाद्यपथकांच्या तीन पेक्षा जास्त रांगा नसाव्यात.

८) अरुंद रस्त्यांवर रांगा २ करण्यात याव्यात.

९) मंडळांचे स्वयंसेवक शिस्तप्रिय व निव्र्व्यसनी असावेत. अरेरावी, उद्धट भाषा, वर्तन करणारे नको.

१०) मंडळांनी गुलालाची विनाकारण उधळण करू नये, जेणेकरून लहान मुले, महिलांना त्रास होणार नाही.

११) मिरवणूक मार्गावरील स्वागत कक्षासमोर वाद्यपथक थांबणार नाहीत.

१२) वादकांनी पायी चालत असताना वाद्य वाजवू नयेत.

१३) एका मंडळासोबत एका प्रकारचे वाद्य पथक असावेत

१४) वादकांची काळजी पथकातील पदाधिकाऱ्यांनी घ्यावी

१५) वादकांना जेवण, नास्ता, पाणी, प्रथमोपचार पेटीची व्यवस्था करावी.

१६) वादकांनी स्वयंशिस्त पाळावी, दुचाकींवरून येतांना घोषणाबाजी करू नये.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या