Thursday, July 23, 2026
HomeनगरAccident News : नगर मनमाड महामार्गावर ट्रक-कारचा भीषण अपघात; पती-पत्नी जागीच ठार

Accident News : नगर मनमाड महामार्गावर ट्रक-कारचा भीषण अपघात; पती-पत्नी जागीच ठार

राहुरी । प्रतिनिधी

अपघातांच्या (Accident) मालिकांमुळे सतत चर्चेत येणाऱ्या नगर मनमाड महामार्गावर (Samriddhi Highway) आज पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. यात पती पत्नी जागीच ठार झाले. ही घटना आज सकाळी पावणे सातच्या सुमारास घडली.

- Advertisement -

याबाबत समजलेली माहिती अशी की, शिर्डी कडून नगरकडे जात असलेल्या अल्टो कार (क्र. एमएच १४ एव्ही ३३७२) ला नगरकडून शिर्डी कडे जात असणाऱ्या माल वाहतूक ट्रकने समोरून जोराची धडक दिली असता अल्टो कार मधील दीपक गोविंद म्हसे व माया दीपक म्हसे (दोघेही राहणार ममदापूर, बाभळेश्वर) हे दोघेही पती पत्नी जागीच ठार झाले आहेत.

दरम्यान घटनास्थळी परिसरातील तरुण मंडळींनी तातडीने मदतकार्य केले. तर रुग्णवाहिक मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...