Saturday, November 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा विलीनीकरणाच्या चर्चा? दिवाळीनंतर १० तारखेला चर्चा करु, शरद पवार...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा विलीनीकरणाच्या चर्चा? दिवाळीनंतर १० तारखेला चर्चा करु, शरद पवार प्रफुल पटेलांमध्ये बातचित

मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात सध्या उपचार घेत आहे. त्याआधी ते पुण्यातही रूग्णालयातच दाखल होते. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. आता शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचा व्हिडीओही व्हायरल झाला असून त्यांच्यात बातचित होताना दिसत आहे. या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेवेळी दिवाळी झाल्यावर म्हणजे १० तारखेनंतर आपण बसू. असे शरद पवार यांनी प्रफुल पटेल यांना सांगितले आहे. अजित पवार यांनी जेव्हा बंडखोरी केली तेव्हा प्रफुल पटेल हे त्यांच्यासह गेले. त्यानंतर आता प्रफुल पटेल यांनी ब्रीच कँडी रूग्णालयात जाऊन शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या दरम्यान शरद पवार यांनी १० तारखेनंतर आपण एकत्र बसू असे प्रफुल पटेल यांना सांगितले आहे. या विधानामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

- Advertisement -

Raj Thackeray: “भाजपात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ…”, राज ठाकरेंचा भाजपवर घणाघात, म्हणाले, भाजपाने पण सहन…

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र येणार का, याबाबत गेल्या काही काळापासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. त्यामुळे पटेल आणि पवार यांची झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. पटेल यांनी १० नोव्हेंबरनंतर शरद पवार यांची पुन्हा भेट घेण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, विलीनीकरणाबाबत कोणताही ठोस निर्णय झाल्याचे पटेल यांनी सांगितलेले नाही.

मोदींच्या फोनबाबत काय म्हणाले प्रफुल पटेल?
शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे कैक वर्षांपासून चांगले राजकीय संबंध आहेत. दोघांनाही एकमेकांबाबत सन्मान वाटतो, आदर वाटतो. शरद पवारांबाबत मोदींना कायमच आदर वाटतो. तसंच शरद पवारांनाही मोदींबाबत विशेष प्रेम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला होता तर ते योग्यच आहे कारण त्या दोघांचे राजकीय संबंधच तसे चांगले आहेत. असे प्रफुल पटेल यांनी म्हटले आहे. UPA चे सरकार होते आणि नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून या दोघांचे चांगले संबंध आहे असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

दिंडोरीतील सशस्त्र दरोड्याचा २४ तासांत छडा; चार आरोपी जेरबंद

0
दिंडोरी | प्रतिनिधी Dindori दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणोरवाडी शिवारात शेतवस्तीवरील घरात घुसून सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीचा दिंडोरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे....