Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकBus Accident : बस अपघातात दहा प्रवासी जखमी

Bus Accident : बस अपघातात दहा प्रवासी जखमी

मनमाड । प्रतिनिधी Manmad

मनमाडपासून जवळ दहेगाव शिवारात पुणे-इंदौर महामार्गावर भरधाव बस पलटी होवून झालेल्या अपघातात आठ ते दहा प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. जखमी प्रवाशांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. पुणे येथून दोंडाईचाकडे जात असतांना हा अपघात झाला

- Advertisement -

याबाबत अधिक वृत्त असे की, एम.एच.-14-बी.टी.-2371 ही बस पुणे येथून दोंडाईचाकडे जात होती त्यात सुमारे 35 प्रवाशी होते. एस.टी. बसने मनमाड बसस्थानक सोडल्यानंतर जात असतांना दहेगाव शिवारात बस पलटी झाली. बस जमीनीवर उलटताच प्रवाशांनी एकच आक्रोश केला.

YouTube video player

अपघात झाल्याचे पाहून परिसरातील ग्रामस्थ व नागरीकांनी तातडीने घटनास्थळी घेतली आणि बचावकार्य करत प्रवाशांना बाहेर काढले. तसेच जे जखमी झाले होते त्यांना मिळेल त्या वाहनाने उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

या अपघातात चैतन्य मनोज शर्मा (रा. नंदुरबार), शिवाजी गोरख पाटील (अंमळनेर), शोभा रमेश भोई, मिना मदनलाल पुराविया (अहमदनगर), मिनाबाई पाटील (अंमळनेर) यांच्यासह इतर काही प्रवाशी जखमी झाले आहेत. चालक भरधाव वेगाने बस चालवत होता त्याचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Ridhima Pathak : ‘देश आधी, लीग नंतर!’ भारतीय प्रेझेंटर रिद्धिमा पाठकची...

0
दिल्ली । Delhi भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंध सध्या अत्यंत तणावपूर्ण वळणावर आहेत. राजकारण आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रांत दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र होताना...