Thursday, January 29, 2026
Homeक्राईमNashik News: कंटेनरच्या धडकेत युवकाचा मृत्यू

Nashik News: कंटेनरच्या धडकेत युवकाचा मृत्यू

नाशिक रोड | प्रतिनिधी
खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात सिन्नर फाटा येथील उड्डाणपुलावरून दुचाकीचालक जात असताना अचानकपणे त्याचा तोल गेल्याने तो खाली पडला. त्यानंतर पाठीमागून भरगाव येणाऱ्या कंटेनरची त्याला धडक बसल्याने तो जागीच ठार झाला.

हा अपघात उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे झाला असून, यामुळे वाहनधारकात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात ठार झालेले युवकाचे नाव समीर मोहन दाते (वय २५, रा. गोदरेज वाडी, सिन्नरफाटा, नाशिकरोड) असे असून हा युवक दुचाकीवरून शिवाजी महाराज पुतळ्याकडून सिन्नर फाट्याकडे जाणाऱ्या बाजूने उड्डाणपुलावरून जात होता. या दरम्यान, खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल गेल्याने तो खड्ड्याजवळ पडला.

- Advertisement -

दरम्यान. पाठीमागून आलेल्या टाटा कंपनीच्या कंटेनरने भरधाव व हयगयीने वाहन चालवून त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर समीर दाते रस्त्यावर कोसळले व त्यांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचे नुकसानही झाले आहे.

YouTube video player

अपघातानंतर कंटेनरचा चालक कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी पोलीस हवालदार अमर गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी कंटेनर चालकाची ओळख पटवली असून, त्याचे नाव विष्णू फेरणसिंग सिकरवार (वय २६, रा. भेतपुरा, पोस्ट गलेथा, जिल्हा मुरैना, मध्य प्रदेश) असे आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पडसाद : कणखर प्रशासकाची अकाली एक्झिट

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. 'देशदूत' - संपादक प्रमोद महाजन (२००६), विलासराव देशमुख (२०१२), गोपीनाथ मुंडे (२०१४) आर. आर. पाटील(२०१५) आणि आता अजितदादा पवार.. महाराष्ट्राने...