Friday, May 3, 2024
Homeधुळेसागवान लाकूड तस्करावर कारवाई

सागवान लाकूड तस्करावर कारवाई

पिंपळनेर – वार्ताहर Dhule

पिंपळनेर (Pimpalner) वनविभागाच्या (Forest Department) रात्रीच्या गस्तीत सागवान लाकडाचा तस्करावर कारवाई मोटरसायकली सह 85 हजाराचे सागाचा मुद्देमाल जप्त अंधाराचा फायदा घेत मोटर सायकल (Motorcycle) सोडून आरोपी पसार.

- Advertisement -

पिंपळनेर वनविभागाचे (Forest Department) वनाधिकारी माळके, वनपाल एम.एन.बच्छाव, वनरक्षक सागर सूर्यवंशी, काळू पवार, सुमित कुवर, गुलाब बहिरम, गार्ड चव्हाण, वाहन चालक विक्रम आहिर, माळी, हे पिंपळनेर नवापूर रस्त्यावर रात्री तीन वाजता गस्त घालत असताना गुप्त बातमी वरून रात्री साडेतीन वाजता कळंबारी घाटात सापळा रचला यावेळी दोन मोटारसायकली वरून सागर चौपट नग आठ घेऊन साग तस्कर पिंपळनेर कडे येत असताना त्यांना वन कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर अटकाव करताच दोघं मोटरसायकल स्वारांनी मोटर सायकल व सागवानी लाकूड सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

वनविभागाने सागवानी आठ- चौकट नग व दोन मोटरसायकली पिंपळनेर वनखात्याच्या डेपोत जमा केले सागवान चौपट आठ- नग घनमीटर एक पंचवीस हजार रुपये किमतीचे व दोन मोटरसायकली 60 हजार रुपये किमतीच्या असे एकूण 85 हजाराचा मुद्देमाल जप्त केला वनविभागाच्या कारवाईमुळे पिंपळनेर कडे चोरट्या मार्गाने येणाऱ्या सागवानी तस्करांवर चाप बसणार आहे मात्र ही कारवाई वनविभागाने सतत चालू ठेवले पाहिजे अशी मागणी होत आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या