Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशअभिनेता सिद्धार्थची सायना नेहवालला पत्र लिहून जाहीर माफी; नेमकं प्रकरण काय?

अभिनेता सिद्धार्थची सायना नेहवालला पत्र लिहून जाहीर माफी; नेमकं प्रकरण काय?

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले होती. या प्रकरणार भारतीय बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालने (Saina Nehwal) एक ट्विट केलं होतं. या ट्विटवर टीका करत साऊथ अभिनेता सिद्धार्थने (Actor Siddharth) अश्लिल टिप्पणी केली होती. यामुळे तो चांगलाच ट्रोल देखील झाला होता.

- Advertisement -

तसेच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनीही सिद्धार्थचा तिखट शब्दात समाचार घेतला. सायनाचे वडील हरवीर सिंह नेहवाल यांनीही सिध्दार्थला फैलावर घेत, त्यानं माफी मागावी, अशी मागणी केली. सर्व बाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर अखेर सिद्धार्थने सायनाची माफी मागितली आहे.

काय म्हटलं आहे सिद्धार्थने?

“प्रिय सायना, काही दिवसांपूर्वी तुझ्या एका ट्विटला उत्तर देताना लिहिलेल्या त्या कठोर विनोदासाठी मी माफी मागत आहे. मी अनेक मुद्द्यांवर तुझ्याशी असहमत असू शकतो पण तुझं ट्विट वाचल्यानंतरची नाराजी किंवा राग व्यक्त करण्यासाठी वापरण्यात आलेली भाषा आणि स्वर याचं स्पष्टीकरण असू शकत नाही. मी नक्कीच यापेक्षा जास्त चांगला व्यक्ती आहे याची मला जाणीव आहे. त्या विनोदाबद्दल स्पष्टीकरण द्यायचं झाल्यास तो खूप चांगला विनोद नव्हता. तो योग्यप्रकारे मांडता आला नाही याबद्दल माफी. मी आग्रहाने सांगू इच्छितो की माझ्या शब्दाचा खेळ आणि विनोदाचा कोणताही दुर्भावनापूर्ण हेतू नव्हता. मी एक स्त्रीवादाचा समर्थक आहे आणि मी खात्री देतो की माझ्या ट्विटमध्ये लिंगभेद नव्हता तसंच एक स्त्री म्हणून तुझ्यावर हल्ला करण्याचा नक्कीच कोणताही हेतू नव्हता. तू हे सर्व मागे सोडून माझं हे पत्र स्वीकारशील अशी आशा आहे. तू नेहमीच एक चॅम्पियन राहशील. प्रामाणिकपणे, सिद्धार्थ,”

दरम्यान सिद्धार्थने माफी मागितल्यानंतर आता सायना नेहवालनेही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेता सिद्धार्थ आधी माझ्याबद्दल काहीतरी बोलला आणि नंतर त्यानं माफी मागितली. ही गोष्ट एवढी व्हायरल का झाली हे मलाही कळत नाही. मला स्वतःला ट्विटरवर ट्रेंड करताना पाहून आश्चर्य वाटलं. तरी सिद्धार्थने माफी मागितल्याने आनंद झाला. तुम्ही अशा पद्धतीनं महिलांना टार्गेट करू नका. पण ठीक आहे. मला त्याची पर्वा नाही. मी माझी आनंदात आहे. देव त्याला आशीर्वाद देवो. असं सायना नेहवाल म्हणाली आहे.

काय आहे प्रकरण?

सायना नेहवालने नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौ-यादरम्यान झालेल्या सुरक्षेतील त्रुटीवरून चिंता व्यक्त केली होती. ‘जर आपल्या पंतप्रधानांच्या सुरक्षेवरच प्रश्न उपस्थित होत असतील, तर तो देश स्वत:ला सुरक्षित म्हणू शकत नाही. पंजाबमध्ये जे काही घडलं, त्याची मी कठोर शब्दांत निंदा करते,’ असे ट्विट तिने केलं होतं.

सायना नेहवालच्या ट्विटवर अभिनेता सिद्धार्थने ट्विट केलं होतं. यामध्ये त्याने द्विअर्थी शब्दांचा वापर करत पुढे ‘शेम ऑन यू रिहाना’ असं लिहिलं होतं. लोकांनीही त्याच्या या ट्वीटवर आक्षेप घेतला होता. तसेच महिला आयोगानेही यासंदर्भात सिद्धार्थला नोटीस जारी केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या