Tuesday, June 10, 2025
Homeमनोरंजनजिया खान आत्महत्या प्रकरण: विशेष CBI कोर्टाने दिला मोठा निकाल; सूरज पांचोलीची…

जिया खान आत्महत्या प्रकरण: विशेष CBI कोर्टाने दिला मोठा निकाल; सूरज पांचोलीची…

मुंबई | Mumbai

- Advertisement -

आज संपुर्ण देशाच लक्ष जिया खान आत्महत्या प्रकरणाच्या (Jiah Khan suicide case) कोर्टाने दिलेल्या निकालाकडे लागून होते. याप्रकरणात सूरज पांचोलीची ( (Sooraj Pancholi)) निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

दहा वर्षांनंतर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालय अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी आज कोर्टान निकाल दिला. या प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आज निकाल देताना कोर्टाने सांगितले की, सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्यायालयात निकालादरम्यान जिया खानची आई देखील उपस्थित होती.

नगर बाजार समिती निवडणूक मतदाना दरम्यान गोंधळ, भाजपची बस मतदान केंद्रावर आली अन्…. पाहा VIDEO

न्यायालयाने निकाल सुनावण्यापूर्वी जियाची आई राबिया यांनीही त्यांच्या वकिलामार्फत आज अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने राबिया खान यांच्या अर्जावर विचार केला नाही आणि निकाल देताना सूरज पांचोलीची जिया खानच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं. यापूर्वी या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत होते आणि त्यानंतर दिवंगत अभिनेत्रीची आई राबिया खान यांच्या याचिकेवर न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले.

Hapus Mango : अस्सल ‘हापूस’ आंबा नेमका ओळखायचा तरी कसा? जाणून घ्या उपयुक्त टिप्स

3 जून 2013 रोजी जियाने तिच्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली होती. जियाची आई राबिया यांच्या तक्रारीवरून तिचा प्रियकर सूरज पांचोलीला अटक करण्यात आली होती. जियाच्या आत्महत्येनंतर 7 जून रोजी पोलिसांना तिच्या घरातून 6 पानी सुसाईड नोट मिळाली होती. त्या सुसाईड नोटमध्ये जियाने सूरज पांचोलीचा उल्लेख केला होता.सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या माहितीनुसार, जिया आणि सूरज रिलेशनशिपमध्ये होते. दोघांची मैत्री सोशल मीडियावरून झाली होती. मग हळूहळू दोघेही एकमेकांना भेटू लागले. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. नात्यातील तणावपूर्ण संबंधांमुळे जिया खूप अस्वस्थ होती.

आता एकाच नंबरवरून चालणार चार मोबाईलमध्ये WhatsApp… कसं सुरू करायचं?

जियाने आत्महत्या करण्यापूर्वी सूरजने तिला असे काही मेसेज पाठवले होते, ज्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती, असे म्हटले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूरजने जियाला 10 मेसेज पाठवले होते, ज्यांची भाषा खूपच वाईट आणि अभद्र होती. आत्महत्येच्या दिवशी जियाने सूरजला अनेकवेळा फोन केला, पण त्याने जियाशी बोलणे टाळले. जियाने तिच्या पत्रात सुरज पांचोलीबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या होत्या. त्याने केवळ जियाला दुःख यातनाच दिल्या असल्याचेही जियाने त्या पत्रात लिहिले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Jayant Patil : “मला प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करा”; शरद पवारांसमोर जयंत पाटलांची...

0
पुणे | Pune  आज (मंगळवार) दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) वेगवेगळे वर्धापन दिन सोहळे पार पडत आहे. यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा (Sharad Pawar NCP) पुण्यातील बालगंधर्व...