Monday, May 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजICC Hall Of Fame: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा;...

ICC Hall Of Fame: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा; ICC कडून सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित

मुंबई | Mumbai
टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात ICC ने मोठा सन्मान केल आहे. आता आयसीसीने त्याच्या नावाचा समावेश हा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये केला आहे. हा खास सन्मान मिळालेला धोनी हा भारताचा १० वा खेळाडू आहे. धोनीसह यावर्षी आयसीसीने हाशिम आमला आणि मॅथ्यू हेडन यांचाही या खास यादीत समावेश केला आहे.

यंदा आयसीसीकडून एकूण ७ खेळाडूंचा बहुमान करण्यात आला असून या ७ खेळाडूंमध्ये ५ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. तसेच धोनी आयसीसीकडून हा सन्मान मिळवणारा एकूण ११ वा भारतीय (नववा पुरुष) खेळाडू ठरला आहे.

- Advertisement -

सोमवारी लंडनमध्ये एका विशेष कार्यक्रमात आयसीसीने एमएस धोनीसह ७ क्रिकेटपटूंना हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केले. यामध्ये दोन महिला क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. क्रिकेटची सर्वोच्च संस्था असलेल्या आयसीसीने २००९ मध्ये हॉल ऑफ फेम सुरू केला. या एलिट क्लबमध्ये फक्त अशाच खेळाडूंचा समावेश केला जातो ज्यांनी क्रिकेटला नवीन उंचीवर नेले आहे. आतापर्यंत एकूण ११५ क्रिकेटपटूंना हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

कॅप्टन कुल म्हणून ओळख
शांत स्वभावासह क्रिकेट मैदानातील सर्वोत्तम रणनितीकार अशी धोनीची ओळख आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने भारतीय संघाला टी-२० वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या तत्कालीन सर्व आयसीसी ट्रॉफी स्पर्धा जिंकून दिल्या आहेत. असा पराक्रम करणारा तो एकमेव कर्णधार आहे. ५३८ सामन्यात त्याने १७ हजार २६६ धावांसह विकेटमागे ८२९ फलंदाजांची शिकार करत क्रिकेट जगतात खास छाप सोडली आहे. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया धोनीने दिली आहे.

धोनीची कारकिर्द
२००४ साली महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले. धोनीने टीम इंडियाला २००७ सालचा पहिलाच वर्ल्ड कप त्याच्या नेतृत्वात मिळवून दिला. त्यानंतर धोनीने कर्णधार म्हणून २८ वर्षांची प्रतिक्षा संपवत २०११ साली आयसीसी वनडे वर्ल्ड कप जिंकून दिला. तसेच २३ जून २०१३ मध्ये धोनीने टीम इंडियाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी महाअंतिम सामन्यात विजय मिळवून दिला. तसेच धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने २००९ साली पहिल्यांदाच कसोटी क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला. धोनीने मोठ्या फटक्यांसह त्याने आपल्या फलंदाजीतील ताकद तर दाखवलीच. याशिवाय मिली सेकंदात स्टंपिंगसह अफलातून कॅचसह त्याने विकेटमागेही धोनी मॅजिक दाखवून दिले आहे.

महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय कारकीर्दीत ३५० एकदिवसीय सामने खेळले. धोनीने या सामन्यांमध्ये ५०.५७ च्या सरासरीने १० हजार ७७३ धावा केल्या. तसेच धोनीने ९० कसोटी सामन्यांमध्ये ३८ च्या सरासरीने ४ हजार ८७६ धावा केल्या. धोनीने या दरम्यान ६ शतके झळकावली. तसेच विकेटकीपर म्हणून कॅच आणि स्टपिंगद्वारे ३०० फलंदाज बाद केले. तसेच धोनीने ९८ टी २०१ सामन्यांमध्ये २ अर्धशतकांद्वारे १ हजार ६१७ धावा केल्या.

‘या’ भारतीय खेळाडूंचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश
भारतीय खेळाडूंमध्ये कपिल देव, सुनील गावस्कर आणि बिशन सिंग बेदी यांना 2009 मध्ये हा सन्मान देण्यात आला. त्यानंतर अनिल कुंबळे (2015), राहुल द्रविड (2018), सचिन तेंडुलकर (2019), विनू मंकड (2021) आणि वीरेंद्र सेहवाग (2023) यांना या एलिट क्लबमध्ये स्थान देण्यात आले. भारतीय महिला क्रिकेटपटूंमध्ये डायना एडुलजी (2023) आणि नीतू डेव्हिड (2024) यांना आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Rahuri Assembly By Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीची आज मतमोजणी

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Rahuri Assembly By Election) झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष आज होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत...