मुंबई :
मुंबईतील जुहू परिसरातून फुटबाॅल मॅच खेळून परतणाऱ्या अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर दुचाकीहून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला आहे. या घटनेत टायगर श्रॉफ याला कुठलीही दुखापत झाली नसून अथवा गोळी लागली नसून या घटनेत त्याचा कार चालक आणि एका रिक्षाचालकाला दुखापत झाल्याची माहिती आहे. अचानक गोळीबाराचा आवाज आला. एकच खळबळ आणि गोंधळ उडाला, सगळेजण सैरावैरा धावत सुटले. गोळीबारानंतर घबराटीचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. जखमी कार चालकावर रुग्णालयात उपचार सुरु झाले असून घटनास्थळी पोलीस पोहचले असून पुढील तपास सुरु झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी अचानक गोळीबार केला. दरम्यान या हल्ल्याची जवाबदारी लॉरेन्स बिष्णोई टोळी कडून स्वीकारण्यात आल्याचे वृत्त आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.




