Thursday, January 8, 2026
Homeदेश विदेश"शेतकरी आंदोलनात महिलांवर अत्याचार अन् अनेक..."; कंगना रणौतचे वादग्रस्त वक्तव्य

“शेतकरी आंदोलनात महिलांवर अत्याचार अन् अनेक…”; कंगना रणौतचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई । Mumbai

नेहमी वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut) पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान (Farmers Protest) महिलांवर अत्याचार आणि अनेक हत्या झाल्याचा आरोप कंगनाने केला आहे. एका वृत्त पत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने हा धक्कादायक आरोप केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कंगना रणौतन आपल्या मुलाखतीत आरोप करताना म्हटले की, आपल्या देशाचे सर्वोच्च नेतृत्व मजबूत नसते, तर या लोकांनी पंजाबला बांगलादेश बनवले असते. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होते, ते संपूर्ण देश पाहत होता. निषेधाच्या नावाखाली हिंसाचार कसा पसरवला गेला. आंदोलनादरम्यान अनेक माणसे मारली गेली, मृतदेहांना लटकवले गेले, बलात्कार झाले.सरकारने कृषी विधेयक मागे घेताच या साऱ्यांना धक्का बसला. कारण त्यांना खूप काही करायचे होते. पण, त्यांच्यावर सरकारने वेळीच नियंत्रण मिळवले, अन्यथा ते काहीही करू शकले असते.

YouTube video player

हे हि वाचा : केंद्र सरकारची मोठी घोषणा! लडाखमध्ये होणार पाच नवीन जिल्हे

आपल्या देशाचे सर्वोच्च नेतृत्व मजबूत नसते, तर या लोकांनी पंजाबला बांगलादेश बनवले असते. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होते, ते संपूर्ण देश पाहत होता. निषेधाच्या नावाखाली हिंसाचार कसा पसरवला गेला. आंदोलनादरम्यान अनेक माणसे मारली गेली, मृतदेहांना लटकवले गेले, बलात्कार झाले.सरकारने कृषी विधेयक मागे घेताच या साऱ्यांना धक्का बसला. कारण त्यांना खूप काही करायचे होते. पण, त्यांच्यावर सरकारने वेळीच नियंत्रण मिळवले, अन्यथा ते काहीही करू शकले असते.

हे हि वाचा : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार राडा! ठाकरे गट-भाजप आमनेसामने

तसेच, अखिल भारतीय किसान सभेनं कंगनाच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. आंदोलनाच्या आडून देशात बांगलादेश घडवण्याचं शेतकऱ्यांचं षड्यंत्र होतं हे कंगना राणावतचं वक्तव्य अत्यंत बेताल आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या ६०० पेक्षा जास्त शेतकरी शहिदांचा, आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो हजारो शेतकरी माता भगिनींचा व देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांचा हा घोर अपमान आहे, असं किसान सभेचे नेते अजित नवले यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime : पैशांवरून बालमित्रांत वैर; वसुलीसाठी थेट जाळपोळ

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बालपणापासूनची घट्ट मैत्री, वर्षानुवर्षांचा विश्वास आणि त्यातून झालेले कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार अखेर गंभीर वैरात बदलून थेट जाळपोळीपर्यंत पोहोचल्याची खळबळजनक घटना...