शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
प्रसिद्ध सिने अभिनेत्री कॅटरिना कैफ (Actress Katrina Kaif) हीने सोमवारी दुपारी शिर्डीत (Shirdi) दाखल झाली. ऐन 12 वाजता तीचे साई मंदिर (Sai Temple) परिसरात आगमन झाले. मात्र त्यावेळी साई मंदीरात साईबाबांची दुपारची मध्यान आरती सुरु असल्याने तिला मंदिरात जाता न आल्याने साई मंदिराच्या बाहेर उभे राहतच तिने साईच्या आरतीला हजेरी लावली.
साईबाबांची आरती संपल्यावर कॅटरिनाने साई मंदिरात जात साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. तिने साई समाधीवर साई राम नाव असलेली शॉलही अर्पण केली. दर्शनानंतर संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे यांनी तिचा सत्कार केला. यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात उपस्थित होते.
आपल्या चाहत्यांपासून लपण्यासाठी मंदिराबाहेर तिने मास्क लावूनच वावरणे पसंत केले. मात्र कॅटरिना साई मंदिरात आल्याची बातमी ऐनवेळी परीसरात पसरल्याने तिला पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. कॅटरिना बर्याच वर्षांपूर्वी सलमान खान (Salman Khan) बरोबर साई दर्शनासाठी आली होती. त्यावेळी ती न्युकमर अभिनेत्री होती. त्यानंतर तिने चित्रपटात प्रसिद्धीचे शिखर गाठले. त्यानंतर तिने सोमवारी बर्याच वर्षानंतर शिर्डीत (Shirdi) येत साई समाधीचे दर्शन घेतले.