Thursday, May 2, 2024
Homeनाशिकदिंडोरी तालुक्यात पाच रुग्णांची भर

दिंडोरी तालुक्यात पाच रुग्णांची भर

दिंडोरी । Dindori

तालुक्यातील रुग्ण संख्या आता ८६ झाली असून आज ५ रुग्णांची भर पडली आहे.

- Advertisement -

तळेगाव येथे २ महिला तर वनी येथे १ रुग्ण आढळलेला आहे.वलखेड व आंबे वरखेडा येथे कोरोनाचे एक एक रुग्ण पॉझीटीव्ह आले असून परिसरात सर्व्हेक्षण सुरू झाले आहे.

आता दिंडोरी तालुक्यातील रुग्ण संख्या ८६ वर जाऊन पोहचली.

वलखेड येथे ४६ वर्षीय खत विक्रेत्यास करोना झाला आहे. या व्यक्तीचे दिंडोरी शहरात खतविक्रीचे दुकान आहे. या व्यावसायिकांच्या संपर्कातील १३ व्यक्तीना विलगी करण विभागात हलवण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे आंबेवरखेडा येथील ७३ वर्षीय वृद्ध नागरिकाला करोना ची लागण झाली आहे.त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. दोन व्यक्तीचे पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर प्रशासनाने दोन्ही गावात सर्व्हे सुरू केला आहे.

सर्व ग्रामस्थांना आरोग्यविषयक सूचना केल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.सुजित कोशिरे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या