Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime News : जबरी चोरी करणारा संशयित ताब्यात

Nashik Crime News : जबरी चोरी करणारा संशयित ताब्यात

आडगाव गुन्हे शोध पथकाची कामगिरी

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

जबरी चोरी (Theft) करणाऱ्या संशयिताला (Suspected) ताब्यात घेण्यात आडगाव गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. या संशयिताकडून एक मोबाईल, एक दुचाकी असा एकूण ५७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अभिषेक उर्फ सोनू ज्ञानेश्वर शिंदे (वय २६, रा. जुना जानोरी रोड, शिंदे मळा, न्यू इंग्लिश स्कूल पाठीमागे, आडगाव शिवार, नाशिक) असे ताब्यात (Detained) घेण्यात आलेल्या संशयितांचे नाव आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Fraud News : मूळ वारसदारासह इन्श्युरंस कंपनीची फसवणूक

याबाबत अधिक माहिती अशी, आडगाव शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल विमल जवळ ५६ वर्षीय जनार्दन पुंडलिक उनव्हणे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. १९ मे रोजी आडगाव गावातून घराकडे जात होते. त्यावेळी मुंबई-आग्रा महामार्गावर आडगाव त्रिफुली पुढील बोगद्याजवळ दुचाकी हून आलेल्या दोन संशयितांनी उनव्हणे यांच्याजवळ येऊन पैश्याची मागणी केली. त्यांच्या जवळील विवो कंपनीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला. तसेच फोन पे कोड घेऊन तीन हजार रुपये देखील काढून घेतले होते. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हें देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी; ‘हे’ उमेदवार रिंगणात

त्यानंतर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाढती जबरी चोरी, मोबाईल चोरी गुन्हे बघता उकल करण्यासाठी आदेशित केली होते. त्यानुसार परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलिस ठाण्याचे (Adgaon Police Station) प्रवीण चव्हाण व आडगाव गुन्हे शोध पथक सदर गुन्ह्यातील संशयितांचा माग काढत होते. यातील संशयित हा आडगाव गावात येणार असल्याचे गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकास मिळाली. त्या अनुषंगाने सापळा रचून संशयित अभिषेक उर्फ सोनू ज्ञानेश्वर शिंदे यास ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता सदर गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण दाइंगडे करीत आहेत.

हे देखील वाचा : मविआचा नाशिक शिक्षक मतदारसंघाचा तिढा सुटला; कॉंग्रेसच्या उमेदवाराची माघार

दरम्यान, सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Sandeep Karnik) परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रविण चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक बोंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रविण दाइंगडे, मयुर निकम, पोलिस सुरेश नरवडे, देवराम सुरंजे, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, ज्ञानेश्वर कहांडळ, दादासाहेब वाघ, पोलिस अंमलदार दिनेश गुंबाडे, सचिन बाहिकर, निखिल वाघचौरे, इरफान शेख, अमोल देशमुख, यांनी केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समितीत 2522 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली....