Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्याअब्दुल सत्तारांच्या होमग्राऊंडवर आज आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आमने- सामने

अब्दुल सत्तारांच्या होमग्राऊंडवर आज आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आमने- सामने

सिल्लोड | Sillod

शिवसेनेतील (Shivsena) फुटीनंतर ठाकरे कुटुंब विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)असा राजकीय सामना बघायला मिळत आहे. या वादाच्या नव्या अंकाला आता….

- Advertisement -

सुरुवात होणार असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thakrey) आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे आज आमने-सामने येणार आहेत. सिल्लोडमध्ये (sillod ) हे दोन्ही नेते आमनेसामने येतील.

खासदार श्रीकांत शिंदे यांची सिल्लोडच्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर सभा होणार असून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून या सभेसाठी गेल्या तीन दिवसांपासून तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंची सभा शहरातील आंबेडकर चौकात होणार आहे.

आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे पप्पू असल्याची टीका राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी सत्तार यांच्यावर आगपाखड केली होती. त्यानंतर आता थेट आदित्य ठाकरेच सत्तारांच्या मतदारसंघात येणार असल्यानं दोन्ही गटात जोरदार राजकीय राडा होण्याची शक्यता आहे.

दोन्ही दिग्गज नेत्यांच्या पुत्रांची सभा एकाच दिवशी असल्याने पोलिसांवर देखील मोठा तणाव आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी सिल्लोड शहरात उद्यासाठी तगडा बंदोबस्त लावला आहे. यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना बंदोबस्तसाठी बोलवण्यात आले आहे. त्यामुळे आज सिल्लोड शहरात छावणीचं स्वरूप पाहायला मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या