Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याघटनाबाह्य सरकार कोसळणारच, मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचा डाव; वज्रमूठ सभेत आदित्य ठाकरे कडाडले

घटनाबाह्य सरकार कोसळणारच, मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचा डाव; वज्रमूठ सभेत आदित्य ठाकरे कडाडले

मुंबई | Mumbai

आज मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पार पडत आहे. या सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्र सोडलं आहे. मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचा डाव राज्यातील विद्यमान सरकारचे आहे. मंत्रिमंडळात घटनाबाह्य सरकार बसले, मी सांगतो थोड्या दिवसांचा खेळ आहे हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच असे भाकित आदित्य ठाकरेंनी व्यक्त केले.

…अन् पोलिसांनी A.R. Rehman चा कार्यक्रम थांबवला, थेट स्टेजवर जाऊन रहमानला सुनावलं

आदित्य ठाकरे म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळात घटाबाह्य सरकार बसलं आहे, आणि मी लिहून देतो की हे थोड्या दिवसाचा खेळ आहे, सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. पण या सरकारमध्ये एकतरी महिली, मुंबईचा अस्सल मुंबईकर दिसला आहे का? कदाचित कोणीतरी स्केअर फूट विकणारे असतील पण इंच इंच जाणणारे कोणी नाहीयेत असे आदित्य ठाकरे म्हणाले. ना मुंबईचा, ना पुण्याचा आवाज आहे. मंत्रीमंडळ पाहिलं तर हे बिल्डर आणि कंत्राटदारांचं सरकार झालं आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडीच्या काळातजी कर्जमुक्ती झाली, कोविडच्या काळात अर्थचक्र बंद असताना देखील अनेक अपत्ती आल्या पण त्यावेळी साडे १४ हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना दिली. मागील काही दिवसांत अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली पण शेतकऱ्यांचा आवाज ऐकणार कोणी या मंत्रिमंडळात नाहीये असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या