Sunday, May 19, 2024
Homeजळगावगणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

यंदा गणेशोत्सवावर (Ganeshotsav) कोणतेही बंधन नसल्याने (no restrictions) गणेश भक्तांसह (Ganesha devotees) भाविकांकडून गणेशोत्सव चैतन्यमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आता आपल्या लाडक्या बाप्पाला (Beloved Bappa) निरोप (say goodbye) देण्यासाठी गणेश भक्तांसह मनपा, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन (Municipality, Police Administration and District Administration) देखील पूर्णपणे सज्ज (got ready) झाले असून त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाकडून विसर्जनासाठी मेहरुण तलावावर (Mehrun Lake) तयारी पूर्ण (Preparation complete) झालेली आहे.

- Advertisement -

अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच दि. 9 सप्टेंबर रोजी ‘श्री’ चे विसर्जन होणार असून सकाळी 8 वाजेपासून भाविकांना विसर्जन करता यावे, यासाठी महापालिकेचे अग्निामन विभागाचेे 25 जणांचे पथक दिवसभर मेहरुण तलाव परिसरात तैनात करण्यात आले आहे. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी 10 वाजेपासून सुरुवात होणार आहे. विसर्जन मिरवणुकीची सुरुवात सकाळी महापालिकेतील मानाच्या गणपतीची आरतीने होणार आहे. गणेश विसर्जनासाठी गुरुवारी मेहरुन तलावावर मनपा बांधकाम विभागाकडून बॅरिकेट्स लावून तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. लाडक्या गणरायाला वाजत-गाजत निरोप देत असताना लेझीम, ढोल पथकासमोर गणेशभक्तांसह कार्यकर्ते नाचत असल्याने बहुतांश गणेश मित्रमंडळांकडून रात्री उशिरा गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येत आहे. म्हणून मेहरुण तलावाच्या परिसरात विद्युत रोषणाईदेखील करण्यात आलेली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून गणेश विसर्जन मार्गाची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. सध्या रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली असून मनपा अधिकार्‍यांकडून या रस्त्यांची पाहणी करण्यात आली आहे.

70 ते 80 सार्वजनिक गणेश मंडळ

विसर्जन मिरवणुकीसाठी यंदा 70 ते 80 सार्वजनिक गणेश मंडळाचा समावेश राहणार आहे. घरगुती मूर्ती विसर्जनासाठी गणेशघाटाकडून करण्यात येणार आहे. तर सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन सेंट टेरेसा विद्यालयाकडून करण्यात येणार आहे. यंदा गणेश मंडळांची संख्या जास्त असल्याने रात्री उशिरापर्यंत गणेश मूर्तीचेे विसर्जन होणार आहे.

सकाळी 10 वाजता वाजता मानाच्या गणपतीने होणार मिरवणुकीस सुरुवात

असा आहे विसर्जन

मिरवणुकीचा मार्ग

विसर्जन मिरवणुकीस छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरुवात करण्यात येईल. त्यानंतर चित्रा चौक मार्गे डॉ.बेंडाळे महाविद्याल, नूतन मराठा महाविद्याल रस्त्याकडून तयारी पूर्ण असलेल्या गणेश मंडळांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरु चौक, टॉवर चौक, भिलपुरा मशिद, महर्षी दधिची चौक, रथ चौक, सुभाष चौक, राजकमल टॉकीज चौक मार्गे संत अप्पा महाराज समाधी मंदिर, पांडे डेअरी चौक, पंचमुखी हनुमान मंदिर, इच्छादेवी चौक, डीमार्ट चौक आणि मेहरुण तलाव असा विसर्जन मार्ग निश्चित करण्यात आला आहे. यंदा मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. मनपा प्रशासनासह अनेक सामाजिक संस्थांकडून विसर्जन मार्गावर गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी टेंट उभारण्यात आलेले आहे.

काव्यरत्नावली चौकात मूर्ती संकलन

काव्यरत्नावली चौक येथे शुक्रवारी सकाळी 7 ते सायं. 7 वाजेदरम्यान युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. मेहरूण तलावावर विसर्जनाची होत असलेली गर्दी बघता या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. घरगुती श्रींच्या मुर्त्या सकलीत करून विधीवतरित्या मेहरूण तलाव येथे युवाशक्ती फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांतर्फे विसर्जित करण्यात येणार आहेत.

बाहेरुन दाखल झालेला बंदोबस्त

विसर्जनासाठी बाहेरुन दाखल झालेले डिवायएसपी 2, पोलीस उपनिरीक्षक 20, नवप्रविष्ट कर्मचारी 100, नवप्रविष्ट महिला 50, पुरुष होमगार्ड 1500, महिला होमगार्ड 200, अमरावती येथील एसआरपी एक कंपनी असे विविध पोलीस पथक दाखल झालेले आहेत. गणेश विसर्जनासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

यांचा असेल पथकात समावेश

जीवरक्षक पथकात बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, सतीश कांबळे, अजीम काजी, निलेश ढाके, स्कायलेब डिसुझा, राजेश सोनवणे, जगदीश बैरागी, ऋषी राजपूत, अमन गुजर, अरुण सपकाळे, चेतन भावसार, कृष्णा दुर्गे, हेमराज सपकाळे, दिनेश सपकाळे, रितेश भोई, रवींद्र भोई, राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे, गणेश सोनवणे, मयूर वाघूलदे, बापू कोळी, श्याम पाटील, प्रदीप शेळके, विनोद सोनवणे यांचा समावेश राहील. तर निर्माल्य संकलनासाठी राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वात युवराज क्लासेसचे विद्यार्थी तसेच रवींद्र फालक, रवींद्र सोनवणे, बाळकृष्ण देवरे, वासुदेव वाढे, छाया ढोले, तुषार रंध्ये, भरत शिरसाठ, मुकेश सोनार, विजय रायपुरे, भूषण चौधरी, जितेंद्र सोनवणे, अमोल देशमुख, गौरव शिंपी हे पथक निर्माल्य संकलन करणार आहेत.

निर्माल्य संकलन, जीवरक्षक पथक सज्ज

जळगाव मनपा प्रशासनातर्फे निर्माल्य संकलन मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत असून सामाजिक संघटनांनी देखील निर्माल्य संकलनासाठी पुढाकार घेतला आहे. मनपा अग्निशमन विभागाचे जीवरक्षक मेहरून तलाव येथे तैनात आहेत. त्याचबरोबर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय आणि वन्यजीव संरक्षण संस्था यांच्या ़संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या निर्देशानुसार मेहरून तलाव येथे जीवरक्षक बोटीसह 20 जीवरक्षकांचे पथक सकाळी 9 वाजेपासून तैनात राहणार आहे. या पथकात पट्टीच्या पोहणार्‍या प्रशिक्षित जीवरक्षकांचा समावेश राहणार असून विसर्जनस्थळी 10 सर्पमित्र, प्रथमोपचार तज्ज्ञ आणि निर्माल्य संकलनासाठी 30 स्वयंसेवक असे एकूण 60 कार्यकर्ते सेवा देण्यास सज्ज झाले आहेत, असे संस्था सचिव योगेश गालफाडे यांनी कळविले आहे. तसेच अमन गुजर हे ड्रोनद्वारे परिसरात होणार्‍या घटनांवर नजर ठेवणार आहेत.

असा असेल पोलीस बंदोबस्त

पोलीस अधीक्षक 1, अप्पर पोलीस अधीक्षक 2, पोलीस उपअधीक्षक 7, पोलीस निरीक्षक 32, सहायक निरीक्षक 55, पोलीस उपनिरीक्षक 83, अंमलदार 2 हजार 966 तर महिला अंमलदार 352, आरसीपी 8 प्लाटून, स्टायकिंग फोर्स 10, क्युआरटी पथक 4 असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गिरणा पंपिंग अन् निमखेडी येथे बंदी

जळगाव शहरात गिरणा पंपिंग आणि निमखेडी येथे गिरणाकाठ धोकेदायक असल्याने मूर्ती विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे फक्त मेहरुण तलावावरच विसर्जन करण्यात येणार आहे. दरम्यान, शहरातील मेहरुण तलाव परिसरासह स्वागत करण्यात येणार्‍या टेंटच्या ठिकाणीदेखील आपत्कालीन वैद्यकीय उपचार सुविधा देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

वाहतूक मार्गात बदल

पाचोर्‍याकडून जळगावात येणारा मार्ग

वाहतूक गणेश विसर्जनाच्या दिवशी मेहरुण तलाव व परिसरात होणारी गदी लक्षात घेता जळगाव शहरातील मार्गांसोबतच शहरातील प्रवेशाच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत. विसर्जनाच्या दिवशी शुक्रवारी पाचोर्‍याकडून येणार्‍या अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. वावडदा, नेरी व अजिंठा चौक मार्गे ही वाहतूक वळविण्यात आली आहे. त्याचदिवशी पाचोर्‍याकडे जाणारी वाहने आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, गाडगेबाबा चौक, गुरु पेट्रोलपंप मार्गे शिरसोली रस्त्यावर वळविण्यात आली आहे. तसेच पाचोर्‍याकडून कार, दुचाकी व लहान वाहनांसाठी मलंगशहा बाबा दर्गा, गाडगेबाबा चौक, संभाजी चौक, महाबळ व काव्यरत्नावली चौकामागेर्र् शहरात येता येणार आहे. मेहरुण तलाव, डी मार्ट, इच्छादेवी चौक, सिंधी कॉलनी व पांडे चौक या मार्गावरुन मिरवणुका येणार असल्याने वाहनांसाठी हा मार्ग बंद करण्यात आला असून सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12वाजेपर्यंत या मार्गावर इतर वाहनांना प्रवेश मिळणार नाही. नागरिक व वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी याबाबत अधिसूचना काढली आहे.

शहरातील या मार्गावर बंदी

गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरु चौक, टॉवर चौक, भिलपुरा मशिद, महर्षी दधिची चौक, रथ चौक, सुभाष चौक, राजकमल टॉकीज चौक मार्गे संत अप्पा महाराज समाधी मंदिर, पांडे डेअरी चौक, पंचमुखी हनुमान मंदिर, इच्छादेवी चौक, डीमार्ट चौक आणि मेहरुण तलाव असा विसर्जन मार्ग असल्याने या मार्गावरुन इतर वाहनांना बंदी आहे.

सार्वजनिक मंडळे

1618

खासगी मंडळे

595

एक गाव एक गणपती

156

जिल्ह्यात 2 हजार 449 गणेश मंडळांकडून होणार विसर्जन

- Advertisment -

ताज्या बातम्या