Sunday, May 19, 2024
Homeजळगावचाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

तालुक्यातील तळेगाव (Talegaon) येथे गेल्या आठवडाभरापूर्वीच घरफोडीत लाखो रुपयांचा एैवज चोरी प्रकरणातील ग्रामीण पाेलीस स्टेशनला (Palis station) दाखल असलेल्या गुन्ह्यात ग्रामीण पोलीसांनी आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतल्याची घटना ताजी असताना, (Ahmednagar) अहमदनगर येथील महिला आई सोबत मालेगाव येथून पॅजोरिक्षाने (chalisgaon) चाळीसगांव तालुक्यातील हिरापूर येथे लग्नासाठी येत असतांना, त्यांच्या पर्समधील जवळपास ६ लाख १२ हजार २०० रुपयांचा सोन्याचा एैवज अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना तक्रार सदर महिलेने अहमदनगर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर हा गुन्हा चाळीसगाव ग्रामीण (police) पोलीसांकडे वर्ग करण्यात आला होता. याही चोरी प्रकरणाचा आठवडाभरातच उलगडा करण्यात ग्रामीण पोलीसांना यश मिळाले असून या प्रकरणात पोलीसांनी चौघाजणांना ताब्यात घेवून त्यांचेकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. आठवडाभरातच दोन चोरीच्या गुन्हांची उकल केल्यामुळे चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे विशेष कौतूक होत असून शहर पोलिसांकडून देखील चोरीच्या गुन्हा बाबत अशाच कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

- Advertisement -

अहमदनगर येथील अंकिता प्रतिक पाटील (वय-२५) ही महिला दि, २८ जानेवारी २०२२ रोजी अहमदनगर येथून मालेगांव आणि मालेगांव येथून चाळीसगांव तालुक्यातील हिरापूर येथे लग्नासाठी पॅजोरिक्षाने जात असतांना महिलेच्या पर्सवर चोरट्यांनी नजर टेवून पर्समधील ५ लाख १२ हजार २०० रुपयांचा किंमती एैवज लंपास केला होता. या प्रकरणी तक्रारीवरुन गु. र. नं. ८५/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल होता.

या चोरीचा मागोवा घेता पो. नि. संजय ठेंग यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. युवराज नाईक, पो. ना. नितीन आमोदकर, पो. ना. गोवर्धन बोरसे, पो. ना. शांताराम पवार आदिंनी गुप्त माहितीच्या आधारे, तपासाअंती पोलिसांनी सात दिवसातच संंजय अंबादास घुमडकर (रा. संतोषीमाता मंदिरा जवळ बस स्टॅन्ड मागे चाळीसगांव), रविंद्र मल्लू घुमडकर (रा. खरजई नाका टाकळी प्र. चा. चाळीसगांव), विकी बाबु घुमडकर (खरजई रेल्वे गेट जवळ चाळीसगांव) आणि नितेश शिवाजी पंच (रा. पंचवटी नाशिक) अशा चौघांना ताब्यात घेतले.

सुरुवातीला त्यांनी उडाव-उडवीचीउ उत्तरे दिली, परंतू त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यानतंर त्यांनी चोरी केल्याची कबुल केले. त्यांचे ताब्यातून ५ लाख १२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत, ग्रामीण पोलीसांनी आठवडाभरात सलग दुसरा चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याने (Divisional Police Officer) विभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे (Kailash Gawde) यांनी यांचे विशेष अभिनंदन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या