Sunday, May 5, 2024
Homeदेश विदेशLPG Gas Cylinder Price : घरगुती पाठोपाठ व्यावसायिक सिलेंडच्या दरात कपात, नवी...

LPG Gas Cylinder Price : घरगुती पाठोपाठ व्यावसायिक सिलेंडच्या दरात कपात, नवी किंमत काय?

दिल्ली | Delhi

घरगुती गॅस सिलिंडरवरील दिलासा दिल्यानंतर आता सणासुदीच्या काळात व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसघरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची मोठी कपात केल्यानंतर आज १ सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी आता व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरवर मोठा दिलासा दिला आहे.

- Advertisement -

१९ किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १५८ रुपयांनी कमी झाली आहे. आता LPG ग्राहकांना नवी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरसाठी १,५२२ रुपये मोजावे लागतील. कोलकात्यात १९ किलो एलपीजी गॅसची किंमत १,६३६ रुपये, मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १,४८२ रुपये आणि चेन्नईमध्ये १९ किलो एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत १,६९५ रुपये झाली आहे. त्यामुळं हा एक मोठा दिलासा ठरत आहे.

झेंडा लावायला मंदिरावर चढले अन्…; तिघांचा करुण अंत, गावावर शोककळा

३० सप्टेंबरपासून सरकारनं घरगुती एलपीजी सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला. यानंतर १४.२ किलोच्या या सिलिंडरचे दर बऱ्याच अंशी कमी झाले. दरात झालेली ही घट उज्वला योजनेतील नागरिकांना मोठा फायदा देणार आहे. आतापर्यंत देशातील १० कोटी लाभार्थ्यांना शासनाच्या वतीनं २०० रुपयांचं सब्सिडी दिली जात होती. ज्यानंतर हा आकडा वाढून ४०० रुपयांवर पोहोचला आहे म्हणजेच नव्या बदलानंतर त्यांना सिलिंडरसाठी ९०३ रुपये भरावे लागणार आहेत आणि यावरही २०० रुपयांची सवलत असल्यामुळं एका सिलिंडरसाठी ७०३ रुपये भरणं अपेक्षित असेल.

Crime News : धक्कादायक! भररस्त्यात अ‍ॅमेझॉनच्या मॅनेजरची डोक्यात गोळ्या झाडून हत्या

- Advertisment -

ताज्या बातम्या