Monday, November 18, 2024
Homeनाशिकबदलापूर घटनेनंतर शालेय शिक्षण विभागाचा महत्वाचा शासन निर्णय जारी

बदलापूर घटनेनंतर शालेय शिक्षण विभागाचा महत्वाचा शासन निर्णय जारी

मुंबई | Mumbai
बदलापूरमध्ये शाळेतील मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर महाराष्ट्र सरकार खडबडून जागे झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थींनीच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न असून या बाबीचा शासन स्तरावर गंभीर दखल घेण्यात आलीय. विद्यार्थ्यांच्या विशेषत: मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना संदर्भात शासन स्तरावर वेळोवेळी आदेश नियंत्रित करण्यात आले आहेत.

- Advertisement -

काय आहे शासन निर्णय?
शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक असणार
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेण्याचे निर्देश
सुरक्षा रक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कूलबसचे चालक इत्यादी व्यक्तींची शाळा व्यवस्थापनाकडून चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस यंत्रणेकडून प्राप्त करुन घेणे आवश्यक
शाळांमध्ये तक्रार पेटींचा प्रभावीपणे वापर व्हावा
सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदींचे अनुपालन

शालेय स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन पुढील एका आठवड्यात करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश
राज्यस्तरीय सुरक्षा आढावा समितीचे देखील गठन करण्यात आले असून अध्यक्षपदी शिक्षण आयुक्त असणार
सोबत आणखी सहा सदस्य समितीत असणार
शालेय विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्यास शाळा व्यवस्थापनाने तो न दडवता शिक्षणाधिकाऱ्यांना सांगावा अन्यथा कारवाई आदेश

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या