Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर मजकूराशी छेडछाड करत आदेशच बदलला!

मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर मजकूराशी छेडछाड करत आदेशच बदलला!

मुंबई –

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका महत्त्वाच्या फाईलमध्ये परस्पर फेरफार करत मजकूर छेडछाड करत आदेशच बदलल्याचा

- Advertisement -

धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

अशोक चव्हाण यांना फाईलवरील शेर्‍याबद्दल संशय वाटला. मुख्यमंत्र्यांची सही असलेल्या अत्यंत छोट्या जागेत हा शेरा कसाबसा लिहला होता. एरवी मुख्यमंत्री सही करताना मजकुर आणि सहीमध्ये पुरेशी जागा सोडलेली असते.त्यामुळे अशोक चव्हाण यांनी ही फाईल पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या फाईल्सच्या स्कॅन करून ठेवल्या जातात. त्या कॉपीज तपासल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सहीच्या वरच्या भागात असा कोणताही शेरा लिहला नसल्याचे स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांनी नाना पवार यांच्या चौकशीसाठी मंजुरी दिली होती. त्यामुळे संबंधित फाईलमध्ये कोणीतरी परस्पर फेरफार केल्याचे उघडकीस आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या