Friday, May 3, 2024
Homeजळगावमुक्ताईनगरात खडसेंविरुध्द आ. मंगेश चव्हाणांचा अर्ज

मुक्ताईनगरात खडसेंविरुध्द आ. मंगेश चव्हाणांचा अर्ज

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (Jalgaon District Cooperative Milk Producers Association) निवडणुकीसाठी (election) शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल (Filing of candidature application) करण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली होती. शेवटच्या दिवशी (last day) 179 उमेदवारी अर्ज दाखल (Filing of candidature application) झाल्याची माहिती निवडणूक निर्णयाधिकारी संतोष बिडवई (Election Referee Santosh Bidwai)यांनी दिली. उद्या दि. 11 रोजी सकाळी 11 वाजेपासून प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी (Scrutiny of candidature applications) होणार आहे. आता या छाननीच्या प्रक्रियेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अंतीम मुदत होती. शेवटच्या दिवशी शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील, भाजपाचे मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, गीता शिरीष चौधरी, अमर जैन यांच्यासह दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

मुक्ताईनगरातून खडसेंविरूध्द चव्हाण सामना

गत काही महिन्यांपासून राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे आणि भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आ. खडसेंना नामोहरम करण्यासाठी आ. चव्हाण यांच्याकडून पोलिसातही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आता तर आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट मुक्ताईनगर तालुका मतदारसंघातून मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करून आ. खडसे यांनी आव्हान दिले आहे. तसेच पारोळा तालुका मतदारसंघातही शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यात लढत होणार आहे.

आता लक्ष छाननीकडे

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर उद्या दि. 11 रोजी सकाळी 11 वाजेपासून जिल्हा दूध संघाच्या कार्यालयात अर्जांची छाननी होणार आहे. या छाननीत कुणाचा अर्ज बाद होतो? याकडे राजकीय वर्तुळासह जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

यांनी भरले अर्ज

एरंडोल तालुका- भागचंद (अमर) जैन, नानाभाऊ महाजन, रामचंद्र मोरे, नाना राजमल पाटील, धरणगाव तालुका- ओंकार मुंदडा, चाळीसगाव तालुका- संजय पाटील, मनिषा रत्नाकर पाटील, आ.मंगेश चव्हाण, सुभाष नानाभाऊ पाटील, जळगाव तालुका- मालतीबाई महाजन, छाया गुलाबराव देवकर, रावेर तालुका- ठकसेन पाटील, जगदिश बढे, गीता शिरीष चौधरी, पारोळा तालुका- आ.चिमणराव पाटील, पाचोरा तालुका- वाल्मिक विक्रम पाटील, धरमसिंग हिंमतसिंग पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, विठ्ठलराव गुंजाळ, अमळनेर तालुका- आ.अनिल भाईदस पाटील, बन्सीलाल पाटील, जिजाबाई पाटील, भुसावळ तालुका- शामल अतुल झांबरे, शालिनी मधुकर ढाके, मनिषा रत्नाकर पाटील, भडगाव तालुका- डॉ.संजीव पाटील, संदीपकुमार पाटील, मुक्ताईनगर तालुका- विनोद तराळ, आ.मंगेश चव्हाण, रमेश जगन्नाथ पाटील, जामनेर तालुका- ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन, नाना राजमल पाटील, दिनेश रघुनाथ पाटील, बोदवड तालुका- अ‍ॅड.रवींद्र प्रल्हाद पाटील, इतर मागासवर्ग- पराग वसंतराव मोरे, विनोद तराळ, मालतीबाई महाजन, भैरवी पलांडे, ठकसेन पाटील, डॉ.संजीव पाटील, दिनेश पाटील, आ.मंगेश चव्हाण, सुभाष पाटील, पुष्पाबाई पाटील, संदीपकुमार पाटील, महिला राखीव- मालतीबाई महाजन, वैशाली प्रमोद पाटील, छाया गुलाबराव देवकर, जयश्री अनिल पाटील, मनिषा रत्नाकर पाटील, कालिंदाबाई घोलप, गीता शिरीष चौधरी, अर्चना नेमाडे, मंगलाबाई महाले, जिजाबाई पाटील, मंगला किशोर पाटील, विमुक्त जाती भटक्या जमाती- कालिंदाबाई घोलप, रवींद्र केदारसिंग पाटील, सुनिता राजेंद्र पाटील, गोपाल धनगर, भास्कर पाटील, अरविंद देशमुख, धरमसिंग पाटील, रामचंद्र मोरे, अनुसूचित जाती जमाती- श्रावण ब्रम्हे, अशोक सुरवाडे

- Advertisment -

ताज्या बातम्या