Saturday, April 26, 2025
HomeUncategorizedवयाच्या 38 व्या वर्षी ही अभिनेत्री करणार लग्न…

वयाच्या 38 व्या वर्षी ही अभिनेत्री करणार लग्न…

मुंबई- मोना सिंगने 2003 मध्ये जस्सी जैसी कोई नहीं मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली होती. या मालिकेत मोनाने एक अशी व्यक्तिरेखा साकारली होती जी दिसायला कुरुप असते पण ती बुद्धीमान असते. या मालिकेनंतर मोनाने राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी, क्या हुआ तेरा वादा, इतना करो न मुझे प्यार, प्यार को हो जाने दो, कवचः काली शक्तियों से, कहने को हमसफर है आणि ये मेरी फॅमिली मालिकांमधुन घरा घरात पोहोचलेली अभिनेत्री मोना सिंग सध्या लाइमलाइटपासून दूर आहे. मोनाने टीव्हीप्रमाणे सिनेमांमध्येही काम केलं. दरम्यान मोना लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा बी- टाऊनमध्ये होत आहे.

सध्या मोना एकता कपूरच्या कहने को हमसफर है मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालिकेची टीम मोनाचे सीन्स आधी शूट करून घेत आहे, जेणेकरून तिला लग्नासाठी सुट्टी देता येईल. 25 दिवसांमध्ये मोना हे शूट पूर्ण करणार आहे. 14 डिसेंबरला मोनाचा सेटवरचा शेवटचा दिवस असेल.

- Advertisement -

मालिकेतील मोनाच्या ट्रॅकमध्ये कोणताही बदल केला जात नाहीये. मोनाला यापूर्वी तिच्या लग्नाबद्दल विचारले असता ती म्हणाली की, मी कधीही माझ्या खासगी आयुष्याबद्दल मीडियासमोर बोलले नाही. पण हेही खरं आहे की, ज्या दिवशी माझं लग्न होईल, मी संपूर्ण जगाला याबद्दल सांगेन.असे तिने सांगितले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २६ एप्रिल २०२५ – मैत्रीतील मंदी परवडणारी नाही

0
मैत्रीचे नाते सर्वांना कायमच भुरळ घालते. तिचे वर्णन करताना साहित्यिकांच्या शब्दांना धुमारे फुटतात. कवींना कविता स्फुरतात. जिवलग मित्रांच्या भेटीच्या अनेक कथा, गोष्टी आणि कविता...