Monday, October 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCrime : बुलेट गाड्यांची चोरी अन् खरेदीचे सहा गुन्हे उघड; दोन संशयित...

Crime : बुलेट गाड्यांची चोरी अन् खरेदीचे सहा गुन्हे उघड; दोन संशयित आरोपी ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महागड्या बुलेट वाहनांचीच चाेरी करुन त्यांची विक्री करणाऱ्या दाेघांना गुन्हेशाखा युनिट दाेनने गजाआड केले आहे. विशेष म्हणजे कारवाईत बुलेटची चोरी करणारा अट्टल चाेरटा व चोरीच्या बुलेट खरेदी करणारा रेकॉर्डवरील संशयित असे दाेघे जाळ्यात अडकले आहेत. त्यांच्याकडून नाशिक शहरातून चाेरलेल्या सहा बुलेट चाेरीच्या घटनांचा सुगावा लागला आहे.

- Advertisement -

इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या २८ मे रोजी पाथर्डी शिवार येथून रात्री १० वाजेच्या सुमारास बुलेट चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाच्या अनुषंगाने उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, हवालदार अतुल पाटील, परमेश्वर दराडे आदींनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची पाहणी केली. त्यात एक संशयित बुलेट चोरी करून जात असताना दिसला.

पुढे पोलिसांनी तब्बल ३५ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून संशयितांचे नाव निष्पन्न केले. तेव्हा संशयित चाेरटा अभय सुरेश खर्डे याने मागील काही महिन्यांपासून विविध पोलिस ठाणे हद्दीत बुलेट चोरी केल्या असून, त्यांची विक्री करण्यासाठी तो सिन्नर फाट्याकडून एकलहाराकडे जाणाऱ्या रोडला येणार असल्याचे पथकाला समजले.

त्यानुसार युनिट दाेनचे प्रभारी सहायक निरीक्षक हेमंत ताेडकर यांच्या सूचनेने सहायक उपनिरीक्षक बाळू शेळके, शंकर काळे, विलास गांगुर्डे, गुलाब सोनार, हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, परमेश्वर दराडे, वाल्मीक चव्हाण, प्रविण वानखेडे आदींनी एकलहारोड येथील गवळी बाबा देवस्थान येथे सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने अभय सुरेश खर्डे (२३, रा. मुपो. झोळे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असेे नाव सांगितले. त्याच्या ताब्यातून एक लाख रुपये किंमतीची बुलेट (एमएस १५५, जीवाय ६९३५) व पंधरा हजार रुपये किंमतीचा मोबाइल असा मुद्देमाल जप्त केला.

पुणे हद्दीत १८ गुन्हे दाखल
अभय खर्डे याच्याकडून सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याने उपनगर पोलिस ठाणे हद्दीत चार तर भद्रकाली आणि इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत दोन असे एकुण सहा गुन्हे केले असून, त्याच्याकडून सहा लाख रुपये किंमतीच्या सहा बुलेट हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, याप्रकरणी बुलेट खरेदी करणारा अनिकेत शिरीष पठारे (२५, रा. दापोडी, जि. पुणे) यास पुढील कारवाईकामी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्याात आले आहे. अभय खर्डे याच्याविरुद्ध पुणे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत १८ बुलेट चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ताज्या बातम्या

अमित

राहुल गांधींची अमित शाह मानहानी प्रकरणातून निर्दोष सुटका, सुल्तानपूर कोर्टाचा मोठा...

0
नवी दिल्ली | New Delhiलोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याशी संबंधित मानहानीच्या खटल्यात मोठा दिलासा...