Thursday, July 4, 2024
HomeनाशिकNashik News : नगरपालिका कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन 

Nashik News : नगरपालिका कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन 

येवला | प्रतिनिधी | Yeola

- Advertisement -

येथील नगरपालिका (Yeola Municipality) कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या करिता भारतीय मजदूर संघाचे वतीने मंगळवार, (दि.०२) रोजी सकाळी ११ वाजता नगरपालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन (Agitation) करण्यात आले. संघटनेने वेळोवेळी नगर पालिका प्रशासनस कर्मचारी मागण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.अनेक वेळा संबंधित अधिकारी वर्गांना विनंती केली, सर्व मागण्या कायदेशीर असून फक्त अमलबजावणी करणे बाकी आहे.

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

संघटनेचे पदाधिकारीनी मागण्याबाबत (Demand) सकारत्मक भूमिका घेतली. संघटनेने पाठपुरावा केला मात्र, सहा महिने होऊन सुध्दा कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने प्रशासनविषयी कर्मचारी वर्गामध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. तर मागसवर्गीय कामगारवर अन्याय होत असल्याने संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचे सघटनेचे कार्याध्यक्ष राधेश्याम निकम यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : शेअर ट्रेडिंगमधील नफ्याचे आमिष दाखवून ३७ लाख रुपये उकळले

दरम्यान, आठ दिवसात प्रश्न सोडवले नाही तर उपोषण, कामबंद आंदोलन (Work Stop Agitation) करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेचे प्रदेश संघटनमंत्री शशिकांत मोरे, श्रावण जावळे यांनी दिला आहे. सदर धरणे आंदोलनात नगर पालिका कर्मचारी सहभागी झाले होते.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या