Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedतळोदा नगरपालिका मुख्याधिकारी दालना बाहेर दोघांचा ठिय्या

तळोदा नगरपालिका मुख्याधिकारी दालना बाहेर दोघांचा ठिय्या

मोदलपाडा | ता.तळोदा वार्ताहर – NANDURBAR

तळोदा येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेण्यात आली यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी मुख्याधिकारी सपना वसावा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा घेण्यात आली.

- Advertisement -

या सभेमध्ये तळोदा शहराच्या विविध विकासाच्या अजिंठा वरील सर्व १४ विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली परंतु शिवसेना नगरसेविका प्रतीक्षा ठाकूर यांनी विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक ६ व १४ ला आपल्या लेखी विरोध केला होता तसे तसे पत्र त्यांनी मुख्याधिकारी यांना दिले.

यावेळी तळोदा शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे यांच्यासह त्यांनी मुख्याधिकार्‍यांकडून जोपर्यंत वरील दोन विषयांबाबत लेखी खुलासा मिळत नाही तोपर्यंत मुख्याधिकार्‍यांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला होता. परंतु या दोन्ही विषयांचा लेखी खुलासा पालिकेच्या मुख्याधिकारी सपना वसावा यांनी दिल्यानंतर तेथून ते परतले.

या सर्वसाधारण सभेत, शासकीय परिपत्रक निर्णय वाचन पालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कर पात्र मूल्यांकन सुधारणा, अनुषंगिक खर्च कमी करणे, को- ऑर्डीनेटर पदाना मुदतवाढ, गटारीतील गाळ, कचरा गोळा करण्यासाठी ट्रॅक्टर भाड्याने लावणे, आरोग्य विभागातील सर्व वाहनांचा विमा उतरविणे, घंटा गाडी दुरुस्ती, एकाकी पदांची कुंठितता घालविणे, श्रीराम नगर, सूर्यवंशी नगर, सुशिला पार्वती नगर, दामोदर नगर, विद्यानगरी, नेमसुशील नगर , सीताई नगर, विष्णुलता नगर, भिकाजी नगर, श्रीजी पार्क याठिकाणी मोकळ्या जागेत झाडे लावणे,

तारेचे कुंपण करणे, वृक्ष संवर्धन करणे, नवीन वसाहती कच्च्या रस्त्यांवर मुरूम टाकणे, थ्री फेज जोडणी करणे, शासकीय परिपत्रकानुसार व वारसा हक्काने सफाई कामगार नियुक्ती, आदीं सह एकूण १४ विषयांना मंजुरी देण्यात आली.

या सभेला नगरसेवक सुभाष चौधरी, संजय माळी, गौरव वाणी, जितेंद्र सूर्यवंशी, हितेंद्र क्षत्रिय, नगरसेविका अनिता परदेशी, प्रतिक्षा ठाकूर, शोभाबाई भोई, सूनयना उदासी, सविता पाडवी, बेबीबाई पाडवी, अंबिका शेंडे, कल्पना पाडवी, सुरेश पाडवी, अमनुद्दीन शेख, रामानंद ठाकरे, हेमलाल मगरे, योगेश पाडवी, यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

तसेच यावेळी कार्यालयीन प्रशासकीय प्रमुख राजेंद्र माळी, दीपक पाटील, नितीन शिरसाठ, आश्विन परदेशी, सुनील सूर्यवंशी, युगश्री पाडवी, लेखापाल विशाल माळी, विनीत काबरा, एम एस गावित, दिगंबर माळी, नारायण चौधरी, मोहन सूर्यवंशी,आदी यावेळी उपस्थित होते.

तळोदा न. पा. च्या शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिक्षा ठाकूर यांनी विषय क्र ६ व १४ ला आपला विरोध नोंदविला त्याबद्दल त्यांनी लेखी निवेदन दिले जो पर्यंत या विषयाबाबत जोपर्यंत त्यांच्याकडून लेखी खुलासा मिळत नाही तो पर्यन्त नगरसेविका प्रतिक्षा ठाकूर व त्यांचे पती शिवसेना तळोदा शहर प्रमुख जितेंद्र दुबे यांनी मुख्याधिकारी यांच्या दालना बाहेर ठिय्या मांडला होता. यां नंतर मुख्याधिकारी सपना वसावा यांनी दोन्ही विषयांचा सविस्तर लेखी खुलासा दिल्यानंतर ते तिथून परतले.

तळोदा नगरपालिकेने शहरात स्वच्छतेचा ठेका नाशिक येथील हे एस आर ग्रीन कंपनीला दिला आहे. पालिकेने त्यांना फॉगिंग मशीन आणायला सांगितले असून त्यामुळे त्या मशीन ने सर्व तळोदा शहरात स्वच्छता व जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे. लवकरच येत्या दोन दिवसात ते मशीन दाखल होईल अशी माहिती नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी दिली.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी मुख्याधिकारी सुख सपना वसावा व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते याप्रसंगी नगराध्यक्षांनी सेवाव्रत निवृत्त कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग फरकाची रक्कम ३५ लाख ५१ हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. ही खुशखबरी कर्मचार्‍यांना दिली त्याबद्दल नगरपालिका कर्मचारी संघटनेतर्फे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या